ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुसेसावळी:-विक्रमबाबा सोशल फाउंडेशन द्वारे आयोजित महातिरंगा रॅलीला जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांना निमंत्रण.

प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव :- 9881355582

खटाव :-विक्रमबाबा सोशल फाउंडेशन यांच्याद्वारे रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित महातिरंगा रॅलीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख
श्री अजयकुमार बन्सल सो यांना विक्रमबाबा सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा येथे निमंत्रण दिले.यावेळी SP साहेबांनी महातिरंगा रॅलीला उपस्थित रहाण्याचे अभिवचन दिले व रॅलीच्या आयोजना संदर्भात काही मौलीक सूचना केल्या.महातिरंगा रॅलीला सातारा जिल्ह्याचे दस्तुरखुद्द SP साहेब उपस्थित राहणार असल्यामुळे फाउंडेशनचे पदाधिकारी व परिसरातील युवा वर्गामध्ये जल्लोशाचे वातावरण निर्माण झाले आहे व रॅलीच्या आयोजनाला त्यांचा उस्फुर्त पाठिंबा मिळत आहे.भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे “हर घर तिरंगा” ही देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची संकल्पना जनतेत राबविण्यासाठी वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक व पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते मा.विक्रमबाबा कदम यांनी या महातिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला आहे.यावेळी निवेदन देताना वडगावचे मा.सरपंच महेश घार्गे,पुसेसावळी चे नेते व ग्रा.पं.सदस्य महेश घार्गे,वडी चे मा.उपसरपंच वसंत यादव,वडगाव विकास सोसायटी चे चेअरमन अनिल पवार,त्रिमली चे सरपंच रामचंद्र येवले,लाडेगावचे नेते दिलीप यादव,गोरेगावचे मा.व्हा.चेअरमन आनंदराव कदम,पारगावचे ग्रा.पं.सदस्य अविनाश चव्हाण,बबलू पाटील,राजू माळवे,पै.अक्षय घाटगे,निलेश माने,सचिन सुतार(सो.संचालक),नानासो घार्गे(सो.संचालक),तुषार मोहिते दिगंबर शिंदे आदी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button