सातारा:-सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू.
सातारा – येथील सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पावसात ही उपोषण सुरु केले. यापूर्वी विविध मागण्यासंदर्भात वारंवार प्रशासनाला निवेदन देण्यात आली परंतु त्यावर ठोस अशी कोणतीही कार्यवाही न झाल्याने हे उपोषण सुरु केल्याचे श्री. सुशांत मोरे यांनी सांगितले.
सातारा जिल्हा प्रशासनाने योग्य कार्यवाही करत नाहीत .तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार श्री. मोरे यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानसभा व विधान परिषद सदस्यांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या वाहनावर लावण्यात येणा-या आमदार हिरव्या रंगाचे स्टिकर लावणा-या वाहनावर कारवाई करणे, जिल्हयातच नव्हे तर राज्यभरात कारवाई करण्यात यावी. महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथील गट नं. २३अ/ १ येथील प्रविण छडा यांचे अनाधिकृत बांधकाम पाडणे तसेच हॉटेल ब्राईट लॅण्ड, लिंग मळा येथील रामदास जांभळे, कोट्ररोशी, पारूट, नाकिंडा, क्षेत्रमहाबळेश्वर, भेकवली, भोसे, तळदेव येथील अनाधिकृत बांधकाम पाडावे, मॅप्रो फुड्स प्रा.लि. शेंदूरजणे ता. वाई यांच्या अनाधिकृत बांधकामाबाबत तसेच पर्यावरणाचा -हास करणा-या तसेच कंपनीला पाठीशी घालणा-या ग्रा. पं. सदस्य, ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि कंपनीवर कारवाई करावी.
सातारा नगरपरिषदेचे आरोग्य निरिक्षक श्री. सागर बडेकर यांच्या कारभाराबाबतचा अहवाल आयुक्त नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे पाठवला आहे. मात्र श्री. बडेकर यांची अद्यापर्यंत बदली झालेली नाही. ती करावी, नगरपरिषद हद्दीतील पेठ मल्हार, सदरबझार, रविवार, गोडोली, येथील अनाधिकृत बांधकामे पाडावी.
जनता अर्बन को ऑप बँक लि. वाई चे कर्जदार प्रकाश भोसले यांच्या खोटे कागदपत्रे सादर करणे, तसेच खोट्या कादपत्रांच्या आधारे कर्ज देणारे जनता अर्बन बँकेचे संचालक, बँक अधिकारी यांची चौकशी होवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
महावितरण कंपनीच्या अधिका-यांना पाठीशी घालणा-या मुख्य अभियंता श्री. सुनिल पावडे यांचेवर शिस्त भंगाची कारवाई करावी, मौजे वेळे कामथी येथील कण्हेर संपादन क्षेत्रातील श्री. संभाजी शिंदे यांचे शासकीय जागेतील अनाधिकृत बांधकाम पाडावे आणि ज्ञानसागर बालकमंदीर रामकुंड या शाळेवर प्रशासक नेमावा आणि जि.प.शिक्षक श्री. शंकर भोसले यांचे बदलीबाबत कारवाई व्हावी आणि मौजे खेड येथील स.नं. ७६/१५ यांचे बिनशेती रेखांकन रद्द करणे. तसेच मौजे सोनगांव ता. सातारा येथील सर्व्हे नं. १५२/ १/१ मधून गेलेला बेकायदेशीर रस्ता आणि सर्व्हे नं. २२२ / २२४ रस्ता उपलब्ध नसताना बिनशेती प्लॉट विकून फसवणूक केलेबाबत व ९ मिटर रूदींचा रस्ता खुला मिळावा. खटाव तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून कृष्णात शिवाजी जगताप यांची चौकशी व्हावी, नागठाणे ता.जि.सातारा येथील स.नं. ६५ या जागेवर श्री. रविंद्र कुंदक यांनी रहिवास कारणासाठी रेखांकन/बांधकामास दिलेल्या परवानगीची चौकशी व्हावे. अतिरिक्त केलेले बांधकाम पाडण्यात यावे. काशिळ, ता.जि.सातारा येथील शणूरबी मंझील या इमारतीचे मालक श्री. सिकदर शेख यांनी बांधकामाबाबत परवानगी नसताना केलेले बांधकाम व शासन परिपत्रक आणि कायदेशीर बाबींचा उल्लेख करून संदीग्धा निर्माण करणा-या इमारत मालकावर गुन्हा दाखल करावा. या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु केले आहे. त्याला काही मान्यवरांनी पाठिंबा दिला. दरम्यान,यावेळी मौजे खेड येथील मोबाईल टॉवर सिल केले. शिव सुंदर कॉलनी येथील निवासी जागेतील व्यवसाय सिल केला. अशी माहिती देण्यात आली.
————————————————-&—–
फोटो -सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंधारातही उपोषण व प्रश्न प्रकाशात आणणारे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे (छाया- अजित जगताप, सातारा)