राहता:-नगर अर्बन बँक लुटणारा कोट्याबंदीचा घोटाळेखोर अमित पंडित लग्नातून पळाला, बेडरूम मधून अटक…!
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
नगर अर्बन बँक लुटणारा कोट्याबंदीचा घोटाळेखोर अमित पंडित लग्नातून पळाला, बेडरूम मधून अटक…!
RPS STAR NEWS
(राहता) :-
नगर जिल्ह्यातील बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्याचे धागेदोरे आता संगमनेर मध्ये पोहोचले आहेत. मा. महसूल मंत्री यांच्या विश्वासातील प्रतिष्ठित उद्योजक व अमृतवाहिनी बँकेचा माझी चेअरमन अमित पंडित यांनी परीस, पुष्कराज इस पाक व पुष्पराज ट्रेडिंग अशा कंपन्या स्थापन करून त्यावर कोट्यावधींचे कर्ज काढले. त्या कंपन्या परस्पर विकून कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून अमित पंडित सह त्यांची पत्नी व मुलगा हे फरार झाले होते. मात्र, अमित पंडित हा आज ऐश्वर्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे राहत्या घरातून दुपारी 3:30 वाचण्याच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतला आहे. नगर नगर आर्थिक गुन्हे शाखेमध्ये त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. अमित पंडित हा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अगदी विश्वासू कार्यकर्ते आहे. त्याला अटक झाल्याने संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
” याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमित पंडित याने वेगवेगळ्या तीन कंपन्या स्थापन केल्या होत्या. यापैकी परीस, पुष्कराज इस पाक आणि पुष्कराज ट्रेंडिंग अशी कंपन्यांची नावे होती. यामधील काही कुटुंबातील सदस्यांच्या देखील नावावर होत्या. या कंपन्यांनी नगर अर्बन बँकेकडून 20 ते 22 कोटीच्या जवळपास कर्ज घेतले होते. एक कंपनीच्या नावावर कर्ज घ्यायचे आणि ती कंपनी दुसऱ्या कंपनीला विकून बँकेच्या डोळ्यात धुळपे करायची. तीच कंपनी दुसऱ्या कंपनीला परस्पर विकली म्हणजे बँकेच्या अडचणी वाढत होत्या आणि हा मात्र नामानिराळा राहत होता. एक कंपनीत रजिस्टर करायची दुसऱ्या कंपनीला विकायची असा याचा उद्योग सुरू होता. मात्र, कर्ज नियमित न भरल्याने हे कर्ज इतके थकले की 30 ते 32 कोटीच्या आसपास गेले. ही सर्व रक्कम नगर अर्बन बँकेला देणे होते. काही कंपन्या बुडाल्या तर काही विकल्या यादरम्यान नगर अर्बन बँकेला कर्ज भरले नाही. त्यामुळे, बँकेचे मोठे नुकसान झाले. तर याने मात्र आपली मालमत्ता क्षितिजापार नेवून ठेवली. एकीकडे गुंतवणूक तर दुसरीकडे पेट्रोल पंपा सह अलिशाल बंगले. तसेच उच्च राहणीमान आणि आमदार, नामदार, खासदार यांच्यासोबत उठणे बसणे ऐटीत सुरू होते.”
दरम्यान, कंपनी स्थापन करून कधी सहा कोटी तर कधी नऊ कोटी पुन्हा सह कोटी असे कोट्यावंदी रुपयाचे कर्ज याने घेतले होते. हे कर्ज नियमित भरले नाही त्यामुळे, बँकेने वारंवार पत्रव्यवहार केला. ह्या कर्जाचा डोंगर इतका झाला की, अमित पंडित सह त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला. इतकेच काय..! त्याच्या मित्राला देखील आरोपी व्हावे लागले. जितका पैसा कमावला, जितकी मौज मजा केली तितके तोंड लपून फिरण्याची वेळ अमित पंडित यांच्यावर आली. कागदोपत्रात स्वतःला पंडित समजणारा व्यक्ती थेट आरोपी म्हणून आता जेलमध्ये बसला आहे. कागदात अफरातफर, बनावट कागदपत्रे, बँकेची फसवणूक कशी आणि कारण झाल्यापासून तो संगमनेरातून फराळ होते. मात्र, आज एका नगरसेवक व्यापाऱ्यांच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्नाला अमित पंडित हे भेट देणार हे कोण कोण संगमनेर शहर पोलिसांना लागली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी एक पथक तयार करून अगदी करडी नजर अमित पंडित यांच्यावर ठेवली आणि त्याचा मागमूस घेऊन त्यास बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस थेट लग्नात पोहोचले…!
शनिवार दि. 16 मार्च 2024 रोजी दुपारच्या सुमारास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला संगमनेर शहरातून कोणीतरी फोन केला. की, तुम्हाला पाहिजे असलेला आरोपी अमित पंडित हा एक व्यापाऱ्याच्या लग्नात आलेला आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाध्यिक्षक यांनी संगमनेर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याशी संपर्क साधून संबंधित मंगल कार्यालय येथे सापळा रचून पंडित याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मथुरे यांनी चोक भूमिका पार पाडून महिलांसह 10 जणांचे पथक तयार करून थेट व्यापाराच्या लग्नात प्रवेश केला. लग्नात कोणत्या प्रकारच्या व्यत्व व्यत्यय येणार नाही याची काळजी घेऊन चारही बाजूंनी सापळा लावला. पण, कदाचित अमित पंडित याला देखील पोलिसांच्या येण्याची चाहूल लागली होती. त्यामुळे त्याने लग्नात उत्तर काढता पाय घेतला. त्यानंतर पंडित ने थेट घर गाठले आणि तो ज्या घोटाळ्याच्या पैशातून मौजमजा करीत होता. लोकांच्या कष्टाचे पैसे लुटून निवांत झोपत होता. त्या घरातील बेडमध्ये जाऊन दडून बसला होता. कदाचित त्याला शंका आली नसती तर पंडितला थेट लग्न मंडपातून अटक केली गेली असती.”
*अशी झाली अटक…!*
दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी अमित पंडित लग्नातून पळाला होता. त्याने थेट घर गाठले आणि कोणी आले तर मी घरी नाही असे सांग असा निरोप पत्नीकडे दिला. त्यानंतर, पोलीस निरीक्षक मथुरे यांचे विशेष पथक, डेप्युटी चे पथक, डीबी कर्मचारी, महिला कर्मचारी व अधिकारी यांनी पंडित च्या घराची बेल वाजवली, ताई साहेबांनी दार उघडले आणि त्यांना चांगलाच झटका बसला. अमित पंडित आहेत का घरात? पोलिसांनी प्रश्न करताच ताईनी खोटे बोलत नाही म्हणाल्या, साहेब पंपावर गेले आहेत, घरात कोण नाही असे म्हणत त्यांनी पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग केला होता. त्यावर अधिकाऱ्यांनी घर जडती घेण्यास विनंती केली. मात्र येथे सौ पंडित आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मात्र, “आधी खाकी मंग बाकी” त्यानुसार महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना बाजूला केले आणि पोलिसांनी थेट घरात प्रवेश केला. कोट्यावधी रुपयांच्या आलिशान घरात आरोपी पंडित चा शोध घेताना नाकीनव आले. मात्र, आरोपी त्यांच्या बेडरूममध्ये दडून बसला होता. पोलिसांनी त्याला एका वेढ्याच्या कोपऱ्यातून ताब्यात घेतले आणि थेट बेड्या ठोकून पोलीस ठाण्यात आणले. फॅशन डायरीला एन्ट्री करून पंडित याला नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमच्या ताब्यात देण्यात येणार आहे.