पुणे :-निःस्वार्थ युथ फाऊंडेशन कडून कन्या सदस्यांना मोफत सेल्फ डिफेन्स स्टिक चे वाटप.
पत्रकार वैष्णवी शिंदे:-9146802009

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे
दि .13 पुणे
भारतात पहिल्यांदा असा उपक्रम – वाढते मुलींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि प्रत्येक मुलीला स्वतःचे रक्षण करण्यासाठी निस्वार्थ युथ फाऊंडेशन कडून कन्या सदस्यांना मोफत सेल्फ डिफेन्स स्टिक चे वाटप.
आपण सगळे सध्या महाराष्ट्रातील वातावरण बघत आहोत महाराष्ट्रात दिवसेंदिवस मुलींवर होणारे अत्याचार वाढत आहेत परंतु त्या कडे कोणाचे च लक्ष नाही नेते मंडळी हे फक्त आपली खुर्ची मिळवण्यासाठी पळत आहेत त्यामुळे मुलींवरील वाढते अत्याचार थांबवण्यासाठी आणि प्रत्येक मुलीला स्वतःचे रक्षण करण्यासाठी “निःस्वार्थ युथ फाऊंडेशन” कडून कन्या सदस्यांना पुढील दहा दिवसात ऑटोमॅटिक सेल्फ डिफेन्स स्टिक चे मोफत घरपोच वाटप करण्यात येणार आहे , त्याचबरोबर हा उपक्रम भारतात सर्वात प्रथम निःस्वार्थ युथ फाऊंडेशन राबवत आहे आणि ते ही कोणत्याच पक्षाचा किंवा कोणाचा ही पाठिंबा न घेता , आता मुलगी रडणार नाही फक्त लढणार – अथर्व उदय पकाले ( संस्थापक अध्यक्ष – निःस्वार्थ युथ फाऊंडेशन )