फलटण:-ट्रिक्स अभ्यासीकेच्या वतीने विधी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अँडव्होकेट शीतल सोनवणे यांचा सन्मान.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ट्रिक्स अभ्यासीकेच्या वतीने विधी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अँडव्होकेट शीतल सोनवणे यांचा सन्मान.
ट्रिक्स अभ्यासिकेच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा जागतिक महिलादिनी गुणगौरव केला जातो.या वेळी फलटण तालुक्यातील शीतल सोनवणे यांच्या कार्याला सन्मानित करण्यात आले. शीतल या एक उत्तम वकील असून त्या मार्गदर्शक म्हणूनही चांगल्या आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाने आज शेकडो विद्यार्थी वकिलीचा धडे गिरवत आहेत.त्यांच्या सहाध्यायी व सहकार्यवृत्तीने त्या विद्यार्थ्यांमध्ये देखील लोकप्रिय आहेत.तसेच वकिली व्यवसायतून त्या अनेकांना न्याय मिळवून देण्यातही तत्पर असतात.संघर्षात हर्ष मानणारे हे व्यक्तिमत्व .स्वामी विवेकानंदांच्या उठा जागे व्हा आणि तो पर्यंत थांबू नका जो पर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय साध्य होत नाही या प्रमाणे हे व्यक्तिमत्व स्वतःला काळाप्रमाणे अपडेट ठेवत स्पर्धा परीक्षेची तयारी करत अंतिम ध्येय जे लिहून ठेवले आहे ते गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे.दुसऱ्यांच्या मुलांना घडवत असताना स्वतःच्या मुलाला देखील त्याच्या इच्छेप्रमाणे शिक्षण शिकू देणारी एक जागृत आई देखील त्यांच्यात पाहण्यास मिळते.ट्रिक्स आशा विनयशील व्यक्तिमत्वास त्यांच्या कार्यास वंदन करते.असेच उत्तुंग कार्य तुमच्या हातून घडावे हीच तुम्हला ट्रिक्स अभ्यासिकेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा ट्रिक्स अभ्यासिकेच्या संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राणी बिनवडे यांच्या हस्ते यावेळी त्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि ज्ञानरचनावाद पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.