सातारा:-बहुउद्देशीय विकास संस्था, सातारा (निर्भया प्रकल्प) व जिल्हा महिला व बाल विकास विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सुशीलादेवी साळुंखे कन्या विद्यालय, सातारा येथे जागतीक महिला दिन कार्यक्रम संपन्न.
पत्रकार मारुती सोमूत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार मारुती सोमूत्ते पुणे जिल्हा उपाध्यक्ष
गुरूवार
दिनांक : – ०७/०३/२०२४
आज रोजी निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, सातारा (निर्भया प्रकल्प) व जिल्हा महिला व बाल विकास विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सुशीलादेवी साळुंखे कन्या विद्यालय, सातारा येथे जागतीक महिला दिन कार्यक्रम घेण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सौ सुजाता देशमुख , तालुका संरक्षण अधिकारी श्री पवन अहिरे सर, तसेच विद्यालय मुख्याध्यापक सौ छाया कदम आणि सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने करण्यात आली.
सदरच्या कार्यक्रमामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सौ सुजाता देशमुख यांनी मुलींना बाल विवाह,बाल मजुरी, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पवन आहीरे सर तालुका संरक्षण अधिकारी यांनी बाल संगोपन योजना व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ या विषयावर मार्गदर्शन केले. व तसेच यावेळी निर्माण संस्थेचे सुचिता सातपुते यांनी निर्माण मार्फत राबवले जाणारे वेगवेगळी उपक्रम बद्दल माहिती दिली यामध्ये , बलिका पंचायत गट , शाळा जनजागृति कार्यक्रम, प्रभावित मुली व महिलांना निर्माण मार्फत केली जाणारी मदत आणि शासकीय यंत्रणेच्या सोबत जे उपक्रम चालू आहेत याचे माहिती आणि निर्माण चे वेगवेगळे उपक्रम व सामजिक कार्याचे माहिती दिली.
सदरच्या कार्यक्रमावेळी ९१ मुली उपस्थित होत्या.
निर्माण संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री विक्रांत मोरे सर यांनी प्रास्ताविक केले व सुचिता सातपुते यानी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी निर्माण संस्थेचे रमेश पुजारी हे उपस्थित होते.