वाई:-ओरखडे कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा.
पत्रकार विश्वजीत जाधव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई:-ओरखडे कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा.

रविवार ,दिनांक १० ऑगस्ट २०२५रोजी नाशिक येथील जगप्रसिद्ध “आजीबाईचं पुस्तकांचे हॉटेल” या ठिकाणी “पलपब प्रकाशन”या संस्थेतर्फे राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या काव्य संमेलनामध्ये
साताऱ्याचे कवी श्री. संजीवकुमार धुमाळे यांच्या “ओरखडे” या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा मा .सौ.भीमाबाई संपत जोंधळे,मा. लेखिका सेजल पाटील, मा.धीरज पाटील,मा साहित्यिक सुहास टिपरे ,मा. उद्योजक अविनाश पाटील,मा.प्रो.वृषाली वानखेडे, मा.पलपब अधिकारी सौ.लीना ताई पाटील,कवयित्री , सुरक्षा पाटील,मा. सुहास राऊत लेखक, कवी संदीप पवार, कवयित्री अश्विनी सांगळे, इ.या साहित्यिक मान्यवरांच्या यांच्या हस्ते उत्साहात पार पडणार आहे. या कविता संग्रहास प्रस्तावना सातारा , नहरवाडी गावचे कवी, लेखक किरण तोडकर सुर्यवंशी यांची लाभली आहे. व पलपब पब्लिकेशन संस्थेने, प्रकाशन या ओरखडे काव्य संग्रहाला दिले आहे, तरी काव्य रसिकांनी सदर संमेलनास उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आले आहे.




