आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.

आज आमच्या शाळेत थोर विज्ञानवादी, समाजक्रांतिकारक संत, निष्काम कर्मयोगी संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

प्रतिमापूजन प्रसंगी सर्व विद्यार्थी गाडगेबाबांचे ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनात सहभागी झाले.

उपशिक्षक श्री.महेशकुमार बोभाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संत गाडगेबाबांच्या जीवन कार्याचा परिचय करून देत असताना अनेक प्रसंगातून बाबांच्या कार्याची ओळख करून दिली.

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. भारती मोहिते मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मणभर विचारापेक्षा कणभर आचार महत्त्वाचा आहे असे सांगितले त्यामुळे गाडगेबाबांचे विचार आणि दशसूत्री संदेशातील एक तरी विचार आयुष्यभर जपावा असे सांगितले.

यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने सर, सर्व शिक्षक, अधिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button