ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-धर्मादाय वकील संघटना अध्यक्षपदी .अॅड मोहन फडणीस.

पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष:-9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
धर्मादाय वकील संघटना अध्यक्षपदी .अॅड मोहन फडणीस.

पुसेसावळी ( प्रतिनिधी ):पब्लिक ट्रस्ट प्रक्टीशनर्स असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून अध्यक्षपदी अॅड. मोहन फडणीस तर उपाध्यक्ष पदी अॅड. हेमंत फाटे, सचिव पदी अॅड. जी. बी. गवई व खजिनदार पदी अॅड. डी. डी. शहा यांची निवड सन २०२३ ते २०२४ या कालावधीसाठी झाली आहे.
या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी अॅड. मोहन फडणीस, अॅड. दिलीपराव हांडे, अॅड. हेमंत फाटे, अॅड. जी. बी. गवई, अॅड. डी. डी. शहा, अॅड. मुकेश परदेशी, अॅड. विजय टिळेकर, अॅड. अमृता गुरव देशमुख, अॅड. डॉ. रोहिणी पवार, अॅड. राजेश ठाकूर, अॅड. अमित टकले यांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली.

नूतन अध्यक्ष अॅड. मोहन फडणीस यांनी संघटनेच्या सर्व वकील सभासदांचा व कार्यालयीन कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्ग यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाईल. धर्मादाय कार्यालयाचे कामकाज जलदगतीने होण्यास ऑनलाइन कार्यप्रणाली सक्षम करण्यासाठी पाठपुरावा पक्षकारांच्या व वकिलांच्या सोयीसाठी व्हर्चुअल हियरिंग त्वरित कार्यरत होण्यास प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच नूतन अध्यक्ष अॅड. मोहन फडणीस हे सातारा जिल्ह्यातील आहेत. पब्लिक ट्रस्ट प्रक्टीशनर्स असोसिएशनमध्ये त्यांनी सचिव व उपाध्यक्ष ही पदे भूषविली आहेत. उपाध्यक्ष अॅड. हेमंत फाटे यांनी सचिव व खजिनदार ही पदे भूषविली आहेत, सचिव अॅड. जी. बी. गवई हे अमरावती जिल्ह्यातील आहेत तर खजिनदार पदी अॅड. डी. डी. शहा हे पुणे येथील आहेत.

सन १९९६ मध्ये पुणे विभागीय सहधर्मादाय आयुक्त कार्यालयात पब्लिक ट्रस्ट प्रक्टीशनर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. माजी धर्मादाय आयुक्त कै. आनंदराव काळे संस्थापक अध्यक्ष होते. गेल्या २५ वर्षात या संघटनेने विश्वस्त कायद्यात अनेक सुधारणा होण्यासाठी योगदान दिले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button