श्रीरामपूर:-रेल्वे रुळावर फिट आल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
रेल्वे रुळावर फिट आल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…
श्रीरामपूर ( RPS न्युज)- श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे रेल्वेच्या धडकेत ३२ वर्षीय तरूण गुरुवारी पहाटे ठार झाला आहे. सुनिल बापू हुके असे या मयताचे नाव असल्याचे समजते.
याबाबतची हकीकत अशी की, सुनिल हुके हा तरूण पढेगाव येथील इंदिरानगर परिसरात राहतो.गुरूवार रोजी पहाटेच्या वेळेस प्रातःविधीसाठी रेल्वे रूळाच्या पलीकडे चालला होता.त्याला फिट येत असल्याने रेल्वे रूळ क्रॉस करताना फिट येवून तो रेल्वे रूळावर पडला आणि त्यानंतर काही वेळाने रेल्वे आल्याने रेल्वेच्या खाली तो ठार झाला, असे सांगण्यात येते.सकाळी बराच वेळ झाला तरी सुनिल हुके हा प्रातः विधीवरून घरी आला नाही म्हणून त्याला पहायला गेल्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आला. त्याला फिट येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अचानकपणे रेल्वे रूळ ओलांडताना फिट येवून तो पडल्याने आणि त्यानंतर लगेच रेल्वे आल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. याबाबत रेल्वे पोलिसात नोंद करण्यात असल्याचे समजते. सुनिल हुके हा तरूण मोलमजूरी करून उदरनिर्वाह चालवायचा. त्याच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.