ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

नवी मुंबई:-हुमगावच्या शिंदेशाहीने जिंकले घणसोलीकरांचे मन…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

हुमगावच्या शिंदेशाहीने जिंकले घणसोलीकरांचे मन…

नवी मुंबई दि: सातारचे सुपुत्र असलेले शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदेशाहीने खऱ्या अर्थाने क्रांती केली आहे. या क्रांतीला जावळी तालुक्यातील हूमगावचे युवा नेतृत्व नगरसेवक श्री सौरभ ऋषिकांत शिंदे यांनी घणसोली प्रभाग क्रमांक नऊ मधून यशस्वी पदार्पण करून मतदारांची मन जिंकले आहेत.
मुंबईचा विस्तार झाल्यानंतर मोठ्या कल्पकतेने काँग्रेस नेतृत्व आणि स्थानिक भूमिपुत्रांनी समन्वय साधून नवी मुंबईची निर्मिती केली. शिवसेनेच्या माध्यमातून सिडको व म्हाडाच्या माध्यमातून नवीन वसाहत आणि औद्योगीकरण वाढले. त्यामुळे रोजगारासाठी सातारा जिल्ह्यातील अनेक भूमिपुत्रांनी नवी मुंबईमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर माथाडी कामगार चळवळीचे आराध्य दैवत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आणि त्यांच्या सहकार्याने नवी मुंबई बाजार समितीच्या आवारात
माथाडींच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली. आणि याच कामगारांच्या न्याय हक्कासाठी आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, सरचिटणीस ऋषिकांत शिंदे व मान्यवरांचे आशीर्वाद घेऊन विद्यार्थी जीवनात सौरभ शिंदे यांनी परिपूर्ण अभ्यास केला. त्यानंतर परदेशी शिक्षण घेऊन आल्यानंतर माथाडी कामगार व स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी तीव्र लढा उभारला. युवा नेतृत्वाची कसब ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेनेमध्ये सामील करून त्यांच्यावर नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्यासाठी घणसोली येथील प्रभाग क्रमांक नऊ मधील जबाबदारी दिली. आणि त्यांनी करिष्मा करून विजयी संपादन केला.
जावळीच्या सुपुत्राच्या यशामुळे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील सुपुत्रांनी आपली छाप पाडली आहे. ज्येष्ठ शिवसेना नेते विजय चौगुले यांच्या
मार्गदर्शनाखाली तसेच अनेक मान्यवरांनी केलेल्या सहकार्यामुळे आज नवी मुंबई सारख्या मोठ्या महानगरपालिकेत शिंदेशाही उदयास आली आहे.
जावळीतील प्रत्येक खेड्यापाड्यातील शिवसैनिक व तरुणांना आता राजकारणामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली मिळाली आहे. नवी मुंबईतील स्थानिक रहिवाशी त्याचबरोबर जावळीकरांनाही मनस्वी आनंद होत असून कुडाळ, सायगाव, करहर, हुमगाव , आनेवाडी, खर्शी, केळघर, तापोळा, पाचगणी , महाबळेश्वर परिसरात जल्लोष साजरा करून या निवडीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विशेषता माजी आमदार दगडू दादा सपकाळ, जावळीचे माजी सभापती मोहनराव शिंदे, शिवसेना संपर्कप्रमुख अंकुश कदम, एकनाथ ओंबळे, संजय मोरे, सुभाष कारंडे, गणेश उतेकर, संदीप तरडे यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button