सावंतवाडी:-उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांबाबत कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सत्य पडताळणीसाठी नेमलेली समिती उद्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन करणार पाहणी.
पत्रकार शैलेश मिस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सावंतवाडी:-उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांबाबत कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सत्य पडताळणीसाठी नेमलेली समिती उद्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन करणार पाहणी.

सावंतवाडी:-उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांबाबत कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सत्य पडताळणीसाठी नेमलेली समिती उद्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाने खंडपीठांसमोर ट्रॉमा केअर बाबत प्रतिज्ञापत्रातून दिलेली माहिती धादांत खोटी असून त्याची पडताळणी जागरूक नागरिकांमार्फत आम्ही केली. त्यामुळे उद्या येणाऱ्या समितीसमोर आम्ही आमची स्वतंत्र भूमिका मांडणार असल्याचे डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी शहरातील जागरूक नागरिकांसह राजकीय नेत्यांकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर एवळे, डॉ.पांडूरग वजराटकर व डॉ. गिरिश चौगुले आदींसोबत चर्चा केली. अनेक विषयांना हात घालत वस्तुस्थिती जाणून घेतली.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर, प्रा. सुभाष गोवेकर,नकुल पार्सेकर,राघवेंद्र नार्वेकर,रवी जाधव, रमेश बोंद्रे, प्रसाद पावसकर आदी उपस्थित होते.




