आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पनवेल:-मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध सामाजिक कार्यक्रम.

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध सामाजिक कार्यक्रम.

पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांचा वाढदिवस दिनांक 24 फेब्रुवारी रोजी आहे त्या निमित्ताने दरवर्षी वाढदिवस साजरा करत असताना त्या प्रभागातील नागरिकांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विषयक अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यावर्षी देखील त्यांनी दिनांक 24 व 25 फेब्रुवारी रोजी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड नोंदणी तसेच भारतीय डाक विभागाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना यांची नोंदणी ठेवली आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी लागणाऱ्या रक्ताची गरज लक्षात घेता दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल सेक्टर 19 खारघर या ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होत त्यांचं रुग्णांसाठी रक्तदान रुपी मदतीचा हात पुढे करावा. अशी विनंती मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी प्रभागातील रहिवाशांना केली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button