सातारा:-छत्रपती शिवरायांची सातारा राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये जयंती साजरी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
छत्रपती शिवरायांची सातारा राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये जयंती साजरी.
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नसून विचार आहेत. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी एका जातीची नव्हे तर सर्व जाती धर्मातील मावळ्यांना एकत्र करून ऐतिहासिक क्रांती केली. त्यांच्या जयंतीनिमित्त आज सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने परिसर दणाणून सोडण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेबांनी केली होती. आजही त्या विचाराची बांधिलकी जपण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाई जिंकल्या. या लढाईमध्ये गनिमी कावा व शूरवीरांच्या जीवावर त्यांनी रयतेचे रक्षण केले. आजच्या घडीला त्यांचा आदर्श घेणारीच व्यक्ती भविष्यात सामाजिक कार्यात पुढाकार घेतील. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व इतर मागासवर्गीय जिल्हा सेलचे जिल्हाध्यक्ष विजय बोबडे, युवक अध्यक्ष मकरंद बोडके व जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला सातारा राष्ट्रवादी काँग्रेस भवन मुख्यालयात सातारा जिल्ह्यातील निष्ठावंत व प्रामाणिक राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक अध्यक्ष मकरंद बोडके, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सचिन जाधव, मागासवर्गीय सेल अध्यक्ष विजय बोबडे, शिक्षक सेलची जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष ननावरे, वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय पिसाळ, प्राध्यापक विकास पवार , स्वप्निल वाघमारे इत्यादी पदाधिकारी ही उपस्थित होते.
————————————————-
फोटो -साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करताना मान्यवर (छाया- निनाद जगताप, सातारा)