खटाव:-प्राध्यापक दिलीप पुस्तके संजीवनी कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
प्राध्यापक दिलीप पुस्तके संजीवनी कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित.
मायणी प्रतिनिधी__संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ आयोजित या संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच ज्योतिष क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला संजीवनी कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यंदाचा हा पुरस्कार प्राध्यापक दिलीप पुस्तके यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष कुलपती विकास खिलारे यांच्या हस्ते व कुलगुरू वेदमूर्ती मोहन पूर्णपात्रे तसेच पत्रकार दीपक प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानाने देण्यात आला. . . . . यावेळी कुलपती विकास खिलारे यांनी सांगितले की प्राध्यापक दिलीप पुस्तके यांनी जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव येथे 32 वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा केली असून त्यांचे अनेक विद्यार्थी उच्चपदस्त आहेत तसेच त्यांनी गेली साडेतीन दशके पत्रकारितेचे काम करीत असून अनेक सामान्य ,गरीब ,गरजू व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून शोध पत्रकारिता, विश्लेषण, चप्पलखता या जोरावर आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे त्यांची उरमोडीचा भगीरथ ही लेखमाला अनेक वर्षे चालली त्यांच्या या यशाचे माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे , माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, वंजारी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मानसिंगराव माळवे, अमोल माळवे, वेदमूर्ती नंदकुमार जोशी, उमेशानंद महाराज, राज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे, तसेच अनेकांनी अभिनंदन केले.