आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:- विद्यार्थ्यांनो काळाबरोबर अपडेट राहा. मा. संजय मांढरे.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

वाई:-
विद्यार्थ्यांनो काळाबरोबर अपडेट राहा. मा. संजय मांढरे.

 

सातारा जिल्हा बॅंक आपणास शिक्षणासाठी कर्ज पुरवठा करण्यास तयार आहे. कर्ज काढणे आता सोपे झाले आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जाची सर्व माहिती घेऊन अपडेट रहावे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी मा. संजय मांढरे यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे शेंदुरजणे येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते शैक्षणिक कर्ज सुविधा या विषयावर प्रबोधन पर व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते श्री. प्रकाश जगताप हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, माजी सरपंच सुरेश जगताप, मुख्याध्यापक रामदास सूर्यवंशी तसेच प्रकल्प अधिकारी डॉ संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. मांढरे म्हणाले, जिल्हा बॅंक ८६ प्रकारांची कर्जे देते. बॅंकेने २००६ सालापासून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज सुविधा सुरू केली आहे. ३० ते ४० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. शेतकरी, व्यापारी व नोकरदार अशा सर्व वर्गातील पालकांच्या पाल्यांना या सुविधेचा लाभ मिळू शकतो. त्यांनी आपल्या भाषणातून बॅंकेच्या कामाची माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. प्रकाश जगताप म्हणाले, आजच्या पिढीला श्रमाबरोबरच संस्कारांचे शिक्षण गरजेचे आहे. तुमच्यातील कौशल्यांना बॅंकेचे आर्थिक साहाय्य लाभल्यास तुमचे भविष्य उज्ज्वल होईल. त्यासाठी आतापासूनच अभ्यासाला लागा असे त्यांनी आवाहन केले.
गौरी गहिण हिने प्रास्ताविक केले. सायली कांबळे हिने स्वागत केले. पूजा निकम हिने पाहुण्यांची ओळख करून दिली. अंकिता रत्नपारखे हिने सूत्रसंचालन केले. सायली ठोंबरे हिने आभार मानले. अलंका अंभोरे व श्रावणी उंबरकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
कार्यक्रमास राजश्री कांबळे, निकिता सुर्वे, शेंदुरजणे तील ग्रामस्थ व एन.एस.एसचे स्वयंसेवक उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button