मायणी:-गुदगे फार्मसी कॉलेजचे आरोग्य शिबिर उत्साहात.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलिप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलिप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
गुदगे फार्मसी कॉलेजचे आरोग्य शिबिर उत्साहात.
___मायणी प्रतिनिधी___मायणी येथील भाऊसाहेब गुदगे कॉलेज ऑफ फार्मसी चे राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस शिबीर गुंडेवाडी (मराठा नगर ,)येथे विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडले. येथील गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब गुदगे कॉलेज ऑफ फार्मसी चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर गुंडेवाडी मध्ये आयोजित आयोजित करण्यात आले एन एस एस विभाग प्रमुख प्राध्यापक सुजित फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात अनेक उपक्रम राबविण्यात आले कॉलेजचे विद्यार्थ्यांनी मंदिर परिसर व सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता केली संस्थेचे चेअरमन सचिन गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडेवाडीतील ग्रामस्थां साठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन सरपंच दिपाली निकम प्रतिनिधी शरद निकम यांच्या हस्ते करण्यात आले. कॉलेजच्या प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी च गावातील 45 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली यावेळी उपसरपंच शिवराम निकम, तुकाराम निकम प्राध्यापक करंजे, प्राध्यापक सुजित फडतरे, प्राध्यापक सोनालीलामंड प्राध्यापक सुकुमार गुंड प्राध्यापक खरात आदी मान्यवरासह गुंडेवाडी चे तमाम ग्रामस्थ उपस्थित होते. (फोटो गुदगे फार्मसी कॉलेजच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिर प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थी)