आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चोराडे:- (खटाव):-जि.प.शाळा-नांदणी वस्ती येथे बाल बाजार उत्साहात साजरा.
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
चोराडे :-जि.प.शाळा-नांदणी वस्ती येथे बाल बाजार उत्साहात साजरा.
जि. प. शाळा-नांदणीवस्ती येथे आज दि. ०३/०२ /२०२४ रोजी बाल बाजार उत्साहात पार पडला. सर्व विद्यार्थ्यांनी पालेभाज्या फळभाज्या इतर साहित्य विक्री साठी आणले होते. वस्ती वरील सर्व पालक खरेदी करण्यासाठी उपस्थित राहिले होते. विद्यार्थी यांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी सदर बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. बाजारातील सर्व मुलांचा माल विकला गेला. विशेष म्हणजे मंच्युरियन या पदार्थाला सर्वाधिक मागणी होती. उत्साही व आनंदी वातावरणात सदर बाल बाजार पार पडला. याबद्दल मुख्याध्यापक श्री. पिसाळ यांनी सर्व पालकांचे आभार मानले.