ताज्या घडामोडी

सातारा:-भाजप सातारा जिल्हाध्यक्षपदी डॉ.आ.अतुल भोसले निवडीने सहकारात इंट्री.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

भाजप सातारा जिल्हाध्यक्षपदी डॉ.आ.अतुल भोसले निवडीने सहकारात इंट्री.

सातारा दि: गेली महिनाभर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य जिल्ह्यातील निवडीबाबत तर्कवितर्क करण्यात येत होते. सातारा जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी रसीखेच सुरू होती. अखेर कराड दक्षिणचे भाजप आ. डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या निवडीने सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातही इंट्री झाल्याचे मानण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत २०१४ व २०१९ रोजी पराभूत झाल्यानंतर तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपवासी झालेल्या डॉ. आ .अतुल भोसले यांच्या नावापुढे आमदार हा शब्द लागला. आता पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या वजनदार जिल्हा असणाऱ्या सातारा जिल्ह्यात महायुतीचे आठ आमदार आहेत.
दिवाळीनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समिती आणि सातारा जिल्ह्यातील नगरपरिषदा निवडणुकीसाठी भाजपने सहकार क्षेत्रातील कराडच्या वजनदार व सहकार क्षेत्रात असलेल्या भोसले घराण्याची तिसरी पिढी म्हणजेच आ. डॉ. अतुल भोसले यांना सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्या लातूरचे जावई असलेले कराड दक्षिणचे भाजप आ. डॉक्टर भोसले हे सर्व परिचित आहेत.
भाजपचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तसेच राज्याचे मंत्रिमंडळातील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि छत्रपतींचे थेट वंशज श्री. छ. खा. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या सहकार्याने सातारा जिल्हा परिषदेवर स्वबळावर भाजपचे कमळ फुलवण्याची जबाबदारी आ. डॉ अतुल भोसले यांच्यावर आलेली आहे. त्या दृष्टीने या निवडीकडे पाहिले जात आहे.
भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापूर्वी कराड कृष्णा सहकारी बँक चेअरमन व विठ्ठल रखुमाई देवस्थान कमिटी पंढरपूरचे माजी चेअरमन पदांवर त्यांनी काम केलेले आहे. जयवंत शुगर व सिद्धिविनायक पेट्रोलियम आणि इतर अनेक संस्थेशी त्यांचे निकटचे संबंध असून शेती व व्यवसाय हा त्यांच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत. त्यांच्या निवडीने खऱ्या अर्थाने भाजपने सहकार क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण करण्याचे पाऊल टाकलेले आहे. दरम्यान, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी या निवडीबाबत स्वागत करून आपल्या इच्छा आकांक्षाला मुरड घातली आहे. याची सद्धा चर्चा सुरू झालेली आहे.

_____________________________
फोटो– भारतीय जनता पक्ष सातारा जिल्हाध्यक्षपदी आ. डॉ. अतुल बाबा भोसले यांची निवड..

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button