ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तापोळा भागातील सोमजाई काळेश्‍वरी देवीची वार्षिक यात्रा सुरू.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

तापोळा भागातील सोमजाई काळेश्‍वरी देवीची वार्षिक यात्रा सुरू.

तापोळा, दि : कोयना धरणाच्या निर्मितीनंतर कोयना जलाशयामुळे जगप्रसिद्ध पावलेल्या तापोळा विभागातील आपटी, केळघर, फुरुस, हात्रेवाडी व निपाणीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सोमजाई काळेश्‍वरी देवीची वार्षिक यात्रा मोठ्या भक्ती भावाने व धूम धडाक्यात सुरू झालेली आहे.
या वार्षिक यात्रेसाठी पुणे मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेल या परिसरातील स्थानिक ग्रामस्थ आपल्या कुटुंब मित्र परिवारास आलेले आहेत. बुधवार, दि. २४ व गुरूवार, दि. २५ जानेवारी रोजी परी पद्धतीनुसार ही वार्षिक यात्रा संपन्न होत आहे.
दि. २४ रोजी सकाळी ७ वाजता देवीची आरती सुरु होते. तदनंतर बुंडा जागराचे आयोजन केले जाते. यावेळी देवीचा गोंधळ घातला जातो. त्यानंतर आपटी गावात घरोघरी पालखी फिरविण्यात येते. रात्री ९ ते १० लेझीम पथकांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता कोल्हापूर येथील नामांकित आर्केस्टा धमाका हा कार्यक्रम होणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यानंतर रात्री १२ वाजता मोठ्या जल्लोषात छबिना काढण्यात येणार आहे. यात्रेसाठी गावी आलेले भाविक व यात्रेकरू पालख्यां आपल्या खांद्यावर घेऊन छबिना काढतात. रात्री १ वाजता बायना शारदा सातारकर यांचा मनोरंजनासाठी तमाशा होणार आहे.
गुरूवार, दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तमाशाचा कार्यक्रम होईल. त्यांनंतर ३ ते ५ जंगी कुस्त्यांचे फड भरवण्यात येईल, अशी माहिती ग्रामस्थ मंडळ आपटी यांनी दिली. सदरची पालखी इतर गावातील भाविकांसाठीही घेऊन जाण्यात असते. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व या भागातील सुपुत्र एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी आल्यामुळे बहुदा ते ही या ग्रामदैवताच्या दर्शनला येथील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
———————————–
ग्राम दैवत चे फोटो

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button