क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-पुसेसावळी परिसरातील अवैध्य दारू विक्री व मटका बंद करा- मा.नवनाथ जाधव.

पत्रकार सौरभ चव्हाण खटाव:-9503995968,

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सौरभ चव्हाण खटाव

पुसेसावळी परिसरातील अवैध्य दारू विक्री व मटका बंद करा- मा.नवनाथ जाधव.
पुसेसावळी पोलीस ठाणे अंतर्गत मटका दारू धंद्याने गरिबांची होतेय लूट..
सर्वसामान्य माणसाला कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलाचा मोठा आधार आहे. त्यामुळेच सामान्य माणसाला जगणं सुसह्य झाले आहे. परंतु सध्या पुसेसावळी पोलीस ठाण्यांतर्गत अनाधिकृत मटका व दारू व्यवसायामुळे सामान्य गरिबांची लूट होत आहे. याबाबत कारवाई व्हावी यासाठी ग्रामस्थ नवनाथ जाधव यांनी साध्या व ग्रामीण भाषेत जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना पोस्टाने निवेदन पाठवले आहे. या निवेदनामध्ये पुसेसावळी पोलीस ठाण्याचे कारभारी असलेल्या अधिकाऱ्याची नाव देण्यात आले आहे. पुसेसावळी गाव मोठे असून परिसरातील अनेक वाड्या वस्ती व गावी आहेत . वडगाव व पुसेसावळी या ठिकाणी अनाधिकृत दारू धंदे, मटका राजरोसपणाने सुरू आहेत. याबाबत कारवाई होणे अपेक्षित आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलीस खात्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहे. याबद्दल कोणाचेही दुमत नाही परंतु लेखी तक्रार करण्यापर्यंत या दोन्ही व्यवसायाने आपले हातपाय पसरल्यामुळेच गोरेगाव वांगी चे युवा कार्यकर्ते नवनाथ जाधव यांनी लेखी निवेदन दिलेले आहे. त्यामुळे या अनाधिकृत दारू व मटका व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच पोलीस अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था बाबत जागरूक राहण्याची त्यांनी तोंडी विनंती केलेली आहे. अन्यथा याबाबत आंदोलन करण्याची त्यांनी तयारी दर्शवली असून तो एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे वाहन तपासणी करावी त्याच बरोबर मटका जुगार व अनाधिकृत दारू धंदे बंद करून कर्तव्य बजावले तर त्यांचा जाहीर नागरी सत्कार घडवून आणला जाईल असे ही नवनाथ जाधव यांनी सांगितले. दरम्यान, अनधिकृत धंदे बंद व्हावेत यासाठी राजकीय पदाधिकार्यांनी पाठिंबा दयावा. अशी ही नम्र विनंती करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button