ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल.

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर

पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल.

सातारा दि. 11 : पाल ता. कराड येथे श्री खंडोबा देवाची यात्रा दि.२० ते दि.२८ जानेवारी २०२४ या कालावधीत भरणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यातून विविध ठिकाणाहून मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी खाजगी वाहनाने तसेच एस टी बसने येत असतात. यामुळे पाल गावात व उंब्रज शहरात मोठया प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत असते. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (१)(ब) प्रमाणे पाल परिसरातील रस्त्यावरील वाहतूकी संबंधीचे आदेश २० ते दि. २८ जानेवारी पर्यंत जारी केले आहे.
काशिळ ते पाल रोडने येणारी सर्व वाहने आदर्शनगर गावाजवळील तात्पुरते एस. टी. स्टॅन्ड समोर थांबवतील व त्याच्या समोरील शेतात पाकींगची व्यवस्था केली आहे तेथे वाहने पार्क करावीत. हरपळवाडी ते पाल येणारी सर्व वाहने ही इमरसन कंपनीजवळ थांबवावीत. तेथील शेतात वाहने पार्क करावीत. तारळे – पाल येणारी सर्व वाहने ही तारळे रोडला पाल ग्रामपंचायतीचे नर्सरी समोर रोडवर थांबवावीत व तेथे पार्क करावीत.
मरळी ते पाल येणारी सर्व वाहने ही खंडोबा कारखान्यासमोर श्रीकांत शेजवळ यांच्या शेताचे समोर थांबवावीत व त्यांचे शेतात केलेल्या पार्कींगमध्ये पार्क करावीत. वडगांव ते पाल हा सर्व रोड आपत्तकालीन रोड असून त्या रोडवर येणाऱ्या सर्व वाहनांना व वाहने पार्किंग करण्यास बंदी आहे. वडगाव ते इंदोली फाटा जाणाऱ्या रस्त्याशेजारी जाग्यवर पार्कींग करीता बंदी घालण्यात येत आहे. दि. 20 रोजीच्या रात्री 10 ते दि. 22 जानेवारी रोजी रात्री 10 वा. पर्यंत पाल गावात येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाईस पात्र राहतील याची नोंद घ्यावी.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button