सातारा:-गोकुळाष्टमीला आ.महेश शिंदे गटात प्रवेश करून फोडली हंडी……
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
गोकुळाष्टमीला आ.महेश शिंदे गटात प्रवेश करून फोडली हंडी……
सातारा दि: कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (शिंदे गट )आ. महेश शिंदे यांनी विकास कामाचा चांगलाच सपाटा लावलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जनहिताच्या कार्यावर विश्वास ठेवून अनेक जण शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आज गोकुळाष्टमीच्या दिवशी आ. महेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये खेड ग्रामपंचायत हद्दीतील अनेकांनी पक्षप्रवेश करून राजकीय हंडी फोडली आहे.
राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. महेश शिंदे हे सध्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा जलसंपदा व पाटबंधारे च्या कामाचा आढावा घेत आहात.चांगल्या पद्धतीने शेतकरी व नागरिकांचे प्रश्न सोडवत आहेत. अगोदर वि कास कामे नंतर प्रसिद्धी…. अशी त्यांची अभिनव भूमिका असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्ष प्रवेश होऊ लागलेली आहेत.
आज सोमवार दि. 26 ऑगस्ट रोजी शेवटच्या श्रावणी सोमवारी व गोकुळाष्टमी दिवशी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन भवन या ठिकाणी झालेल्या पक्षप्रवेशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर व काही पत्रकारांनीही आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात म्हणजेच शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.
आज शेवटचा श्रावणी सोमवार व गोकुळाष्टमीनिमित्त अनेक ठिकाणी दहीहंडी साजरी होत आहे. त्या सर्वांना शुभेच्छा देऊन आ. महेश शिंदे यांनी सांगितले की, आज मोठ्या प्रमाणात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात इतर पक्षातून कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वास वाढलेला आहे. आमच्या सोबत सहकार्य करणारे ज्येष्ठ युवा नेते संदीप शिंदे, रमेश अनिल उबाळे, उपसरपंच सुधीर काकडे, विजय काळे, रवि बोतालजी, युवराज कांबळे,कांतीलाल कांबळे, संदीप चव्हाण, नरेश बोकेफोडे व अन्य कार्यकर्ते विकास कामे पोहोचवण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
त्या परिश्रमाचे चीज करण्यासाठीच शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, शिवसेना पदाधिकारी व मान्यवरांचे सहकार्य लाभत आहे. हा पक्षप्रवेश म्हणजे विकास कामावर विश्वास ठेवून कार्यकर्ते येत आहेत. या सर्वांनाच सन्मानाची वागणूक दिली जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळेला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष यांनी स्वतः आ .महेश शिंदे यांनी भारत माता की जय… व डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय घोष करून या पक्षप्रवेश करणाऱ्या रामभाऊ लंकेश्वर, स्वप्निल गव्हाळे, नितीन शिंदे, राजू माने व मान्यवरांचा शाल श्रीफळ व बुफे देऊन शिवसेना पक्षात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. लवकरच मोठ्या प्रमाणात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मेळावा घेऊन पुन्हा एकदा युवाशक्तीची ताकद दाखवून देण्यात येईल. असा विश्वास आ. महेश शिंदे मित्र मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. .. .. ……..
फोटो -सातारा इथे आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करणारे मान्यवर कार्यकर्ते व समर्थक (छाया- अजित जगताप, सातारा)
—&———————————–+——– चौकट—– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्षपदी काम करणारे श्री रमेश अनिल उबाळे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीला गळती सुरू झाली आहे. ही गळती केव्हा थांबणार? असा प्रश्न राजकीय पटलावरील जेष्ठ कार्यकर्ते विचारू लागलेले आहेत.