कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यातील विलासपूर- गोळीबार मैदानात मोफत स्टॉल संकल्पनेने ग्राहकांची पैशाची बचत.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

 

साताऱ्यातील विलासपूर- गोळीबार मैदानात मोफत स्टॉल संकल्पनेने ग्राहकांची पैशाची बचत.

सातारा दि: श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रपरिवार विलासपूर -गोळीबार मैदान व युवा नेते संग्राम बर्गे लोकसेवा केंद्र आयोजित प्रभागातील महिला भगिनींसाठी गृहलक्ष्मीचे उद्योग लक्ष्मी महोत्सव २०२४ आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवामध्ये माता-भगिनींसाठी मोफत स्टॉलची उभारणी केल्यामुळे असंख्य ग्राहकांच्या पैशाची बचत होत असल्याचे सिद्ध झालेले आहे.
ग्रामीण भागातून शहरात आलेल्या महिलांनी गृहपयोगी वस्तू व स्वतःची हस्त कला सादर करून विविध वस्तूंची निर्मिती केली आहे. त्यांना एक चांगलं बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते.
आज सकाळी श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाघाटन करण्यात आले . दिनांक पाच, सहा, सात जानेवारी या तीन दिवसासाठी गृहलक्ष्मी ते उद्योग लक्ष्मी महोत्सव होत आहे. या वेळेला संग्राम बर्गे, गीतांजली कदम व रंजना राऊत, सुवर्णा पाटील त्यांच्यासह महिलावर्ग ज्येष्ठ नागरिक, बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर स्टॉल परिसरात विविध प्रकारची दागिने ,खेळणी, सुगंधी द्रव्य, अगरबत्ती, कपडे, पिशवी व विविध पदार्थ, खाद्यपदार्थ, शाकाहारी मांसाहारी पदार्थ ,त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळणी व सौंदर्यप्रसाधने आरोग्याची काळजी घेणारी औषधे अशा प्रकारचे विविध वस्तू या ठिकाणी मापक दरात उपलब्ध करण्यात आलेले आहे.
या महोत्सवासाठी अनेक लोकांनी उद्घाघाटनाच्या वेळेलाच वस्तू खरेदी करून जिव्हाळा जपला आहे .त्याबद्दल आयोजक संग्राम बर्गे यांनी विलासपूर गोळीबार मैदान परिसरातील नागरिकांना धन्यवाद दिले आहेत. चांगली स्वच्छता व शुद्ध पिण्याचे पाणी आणि बंदिस्त या स्टॉलमुळे खऱ्या अर्थाने सातारकरांसाठी एक भव्य असे दालन उभे केले आहे. यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्वांना अल्पोहार देण्यात आला. तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांना युवाशक्ती फाउंडेशन सातारा संग्राम बर्गे मित्र परिवाराच्या वतीने दिनदर्शिका भेट देण्यात आली.
———–&-&——————

फोटो -सातारा शरद असलेल्या विलासपूर गोळीबार मैदान परिसरात मोफत स्टॉलची उभारणी करून ग्राहकांसाठी दालन उपलब्ध करण्यात आले (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button