कराड:-स्व.शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड चा निकाल आपल्या दारी अनोखा उपक्रम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

स्व.शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड चा निकाल आपल्या दारी अनोखा उपक्रम.

कराड:-नवनवीन उपक्रमांनी समाजाभिमुख बनलेली शिक्षण मंडळ , कराडची ISO मानांकनप्राप्त स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, कराड ही शाळा नेहमीच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण आणि बौद्धिक विकासासाठी आग्रही राहिली आहे.
या वर्षी प्रशालेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ. हेमलता जंगम यांच्या कल्पनेतून साकारलेला
‘ निकाल आपल्या दारी ’ हा आगळावेगळा उपक्रम पालक-शिक्षक संवादाचा एक सुंदर दुवा ठरला.
इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा राखणाऱ्या या प्रशालेने
प्रथम सत्र परीक्षेत कमी गुण मिळविलेल्या विद्यार्थिनींच्या घरी जाऊन त्यांच्या उत्तरपत्रिका व निकालासह पालकांशी प्रत्यक्ष भेट घेतली.
संवादातून विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेतल्या गेल्या, तर काही ठोस उपाय सुचविण्यात आले.
या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त आणि कृतज्ञ प्रतिसाद मिळाला.
“ आपल्या मुलीच्या प्रगतीसाठी शिक्षक घरी येतात, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ”असा भाव पालकांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
या उपक्रमात सहभागी झाले मा.मुख्याध्यापिका सौ. हेमलता जंगम, उपमुख्याध्यापिका सौ. छाया कुंभार,
पर्यवेक्षिका सौ. सुनिता अवघडे, शिक्षिका सौ.मृणाल जाधव – पाटील , सौ. सत्वशीला नांगरे, आणि क्रीडा विभागप्रमुख डॉ. महेंद्र भोसले. ‘ निकाल आपल्या दारी ’ — पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नातं अधिक दृढ करणारा उपक्रम!




