महाबळेश्वर:- गुताड येथील उपकेंद्र दुधगाव येथे स्थलांतराची दखल घेत शासनाची मान्यता.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
महाबळेश्वर:- गुताड येथील उपकेंद्र दुधगाव येथे स्थलांतराची दखल घेत शासनाची मान्यता.

महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम दिशेला असलेल्या झांजवड, दुधगाव, चतुरबेट, गोरोशी, घोणसपुर, देवळी या पंचकृशी दरम्यान एकही दवाखाना किंवा उपकेंद्र नव्हते जवळपास सन 2006 पासून म्हणजेच गेली 20 एक वर्षापासून समाजसेवक डॉक्टर कुलदीप शिवराम यादव समाजसेवक अनंत शंकर जाधव याकरिता पाठपुरावा करत होते कारण महाबळेश्वर तालुक्यातील या भागात वाडा कुंभरोशी ते तापोळादरम्यान एकही सुसज्ज असा दवाखाना नव्हता सर्दी पडसे ताप यावर उपचार करणारे साधारण डॉक्टर एखाद दुसरा असेल परंतु साप चावणे हिंसक जनावर चावणे हिंसक जनावरांचा हल्ला होणे अपघात हृदयवितराचा झटका येणे पॅरॅलिसिस हात पाय मोडणे यासारख्या गंभीर आजारावर त्वरित उपचार करणारे दवाखाने नव्हते तापोळा तळदेव या ठिकाणी आहेत परंतु त्यात पूर्ण सुविधा नाही दवाखाने आहेत पण त्यात कधीकधी डॉक्टर देखील नसतात किंवा असले तर उपचार साठी त्यांच्याकडे पुरेसे सुविधा नसते.
याचा शासन दरबारी पाठ पुरावा करत असताना विलंबनाने का होईना शासनाने दखल घेऊन उपकेंद्र स्थलांतरास मान्यता दिली आहे त्याबाबत भागातील समस्त नागरिक माननीय नामदार मकरंद आबा पाटील व उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार मानत आहे त्याचबरोबर डॉक्टर कुलदीप शिवराम यादव व अनंत शंकर जाधव यांचा देखील आभार मानत आहेत, आणि यापुढे दुधगाव येथे लवकरात लवकर उपकेंद्र उभे राहील याची अपेक्षा भागातील समस्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शासनाने उपकेंद्र स्थलांतरास मान्यता दिल्यापासून मागील दोन तीन दिवसांपासून समस्त पुढा-यांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. असो पुढा-यांनी स्वतः श्रेय घेतले तर आमचे काही म्हणने नाही. परंतू सदर विषयाचे बि कोणी पेरले उगम कोणी केला हे तरी त्यांनी विसरू नये असे आम्हाला वाटते. आपल्या जन्माच्या अगोदर पासून भाग कसा होता, आपल्याला कळायला लागल्यापासून कसा आहे व आता कसा आहे हे तरी समजून घेऊन श्रेय घ्यावे. आता त्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले म्हणून श्रेय घेतले तर आमचे काही म्हणने नाही परंतू मागील २०- २२ वर्षापासून हा विषय शासन दरबारी मांडणे त्याचा सातत्याने पाठपुरावा करणे असे ज्यांनी प्रयत्न केले त्यांना विसरणे म्हणजे माणूसकी गहाण ठेवण्यासारखे आहे. असो ज्याला ज्याला श्रेय घ्यायचे त्यांनी घ्यावे परंतू आमच्यासाठी उपकेंद्र बांधून मिळणे हेच आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.




