ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे पिंपरी:-संविधान वाचविण्यासाठी नाना काटे यांना विजयी करा – आनंदराज आंबेडकर

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

संविधान वाचविण्यासाठी नाना काटे यांना विजयी करा – आनंदराज आंबेडकर
पिंपरी, दि. २२ (शफिक शेख) :- लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी भाजपाच्या पराभवासाठी एकत्र येणे आवश्यक असल्याने आम्ही चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे रिपब्लीकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
रहाटणी येथे पत्रकार परिषद घेऊन आनंदराज आंबेडकर यांनी चिंचवड मतदार संघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केला. यावेळी मुकुंद रणदिवे, संजय गिरमे, युवराज बनसोडे, सुनील बनसोडे, संदीप रणदिवे, अजय गायकवाड, जयदेव रणदिवे, राजू गायकवाड, संदीप साळुंखे, सचिन सूर्यवंशी, विशाल बेनके, सर्जेराव वाघमारे, सुनील जयस्वाल यांच्याह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, वंचितने कोणालाही पाठींबा दिला असला तरी आंबेडकरी जनता सुज्ञ असल्याने संविधानाला धोका निर्माण करणाऱ्या शक्तींना मदत करणाऱ्या कोणालाही ते मतदान करणार नाहीत. त्यामुळे आंबेडकरी जनतेचा एकमुखी पाठींबा काटे यांनाच राहिल आणि नाना काटे यांच्या विजयासाठी आंबेडकरी जनताच पुढाकार घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यापुढील जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांसह प्रत्येक निवडणुकीत रिपब्लिकन सेना महाविकास आघाडीच्या सोबत असेल व प्रत्येक ठिकाणी भाजपचा पराभव होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button