क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गंगापुरःसावरखेडा येथे कोयत्याने तरूणावर प्राण घातक हल्ला.

प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

गंगापुरःदिलेले पैसे न देता पळुन जा असे का म्हणाला असे जाब विचारत दोघांनी 26 वर्षीय तरूणाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच कोयत्याने डोक्यात वार प्राणघातक हल्ला केला.इम्रान शेख व ईरफान शेख रा.सावरखेडा ता.गंगापुर यांनी लुचारी यास उसने पैसे दिले होते.ईरफान व इम्रान यांना पैसे न देता तु पळुन जा असे तु लुचारी स का म्हणाला,या कारणा वरून तसेच जुन्या भांडनाच्या वादावरून आरोपीनीं शुभम भानुदास जाधव वय 26 रा.सावरखेडा याला शिवीगाळ करत जबर मारहाण केली व तसेच कोयत्याने डोक्यात व पाठीवर वार करत प्राणघातक हल्ला केला.ही घटना पांढरओवेहळ येथे सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.या हल्ल्यात शुभम जाधव हा गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी शुभम भानुदास जाधव यांच्या फिर्यादिवरुन आरोपी इम्रान शेख व ईरफान शेख यांच्या विरोधात वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button