Big Breking- वाई:-पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई:-पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी.
वाई परिसरातील पांडव गडावर इंदापूर तालुक्यातील गिर्यारोहक पर्यटनासाठी आले होते.त्यातील काही पर्यटकांनी परफ्यूम लावलेला होता.त्यामुळे जंगली मधमाशांच्या हजारो टोळक्याने पर्यटांवर हल्ला चढविला.त्यातील दोघेजण बेशुद्ध अवस्थेत गेले. आल्हाद दंडवते,निखिल क्षिरसागर, गोपाळ आवटी, अशी जखमींची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस व वाई तालुका वैद्यकीय पथकाने धाव घेतली.गिर्यारोहक प्रशांत डोंगरे, शिवसह्यद्री अकॅडमीचे खरात सर तातडीने पांडव गडावर गेले.परंतु जखमींना खाली आणणे सोयीचे होत नव्हते. दिशा अकॅडमी चे प्रा.डॉ नितीन कदम सर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दिशा शिवसह्यद्री रेसक्यु टीम पांडव गडावर पाठवली.प्रा.धनंजय यादव व प्रा.निलेश मोरे टीम बरोबर पांडव गडावर गेले व तातडीने खरात सर व प्रशांत डोंगरे रोहीत मुंगसे आणि रेसक्यु टीम ने जखमींना गडा खाली आणले. त्यांना पुढील उपचारा साठी वाई ग्रामीण रुग्णालयात आणले आहे.
वाई पोलिस ठाण्याचे श्रीनिवास बिराजदार, नितीन कदम,कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ दिलीप भोजने,नरेंद्र सणस, सी बी जाधव, अजित चव्हाण, गीता वाठारकर,आदिंनी बचाव कार्यात सहभाग घेतला होता.