आष्टी :-सुलेमान देवळा :-सुलेमान बाबांची जत्रा मोठ्या उत्साहात साजरी.
प्रतिनिधी:-राजकुमारी इकडे

सुलेमान बाबांची जत्रा मोठ्या उत्सव साजरी.
आष्टी:- तालुक्यातील मोजे सुलेमान देवळा गावातील नवसाला पावणारां जागृत दर्गा देवस्थानची जत्रा आज पारंपारीक पध्दती नुसार साजरी करन्यात आली आहे. नगर बीड जिल्हातील भाविक भक्त या जत्रेसाठी नागरिक मोठी गर्दी करतात. हिन्दु -मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणुन सुलेमान बाबांच्या दर्गा प्रख्यात आहे. समस्त ग्रामस्थांच्या वतीने दर्गा परिसरात दिवसभर अन्नदान चालू असते.गावातून वाजत गाजतं पालखी घेऊन भाविक येतात. पारंपारीक व्यादय सह बॅड तोफा सह मिरवणुक करून,दर्गावर चादर चढवण्यात येते. लहान थोर मातां भगिनी सह हिन्दु मुस्लीम बांधव गुण्याआणि गोविंदाने ऐकत्र येवून जत्रा करतात. गावांतील लेकी बाळीनी केलेले नवस फेडणासाठी महिलाची उपस्थिती जास्त असते.गावातील तरूण एकत्र येवून जत्रा पार पाडण्यासाठी स्वःता पुढाकार घेतात. व सायकांळी गावातून छबिना मिरवून करून जत्रा उत्सव समाप्त होतो.