वाई तालुक्यात सोयाबीन वर लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव – कृषि विभाग सतर्क
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई तालुक्यात सोयाबीन वर लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव – कृषि विभाग सतर्क

वाई तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु सध्या वातावरणातील अनिश्चित बदलामुळे पिकावर किड व रोगांचे प्रमाण वाढत आहे.त्यातच आता लाल कोळी या किडीचा सोयाबीन काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.परंतु याचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यास सोयाबीन उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
मंडळ कृषि अधिकारी कार्यालय वाई कार्यक्षेत्रातील विरमाडे, उडतरे, पाचवड या गावामध्ये मंडळ कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी यांनी प्रक्षेत्र भेट दिली असता सोयाबीन पिकावर लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाय योजना करण्यासाठी कृषि विभागाने प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे.
हा कोळी चपळ, वर्तुळाकार, लालसर असतो,पानावर तो मागच्या बाजूला सैरावैरा धावत असतो ही किड पानाच्या मागच्या बाजूला राहून रस शोषण करते त्यामुळे पाने चुरडू लागतात. प्रादुर्भावग्रस्त पानाच्या खालच्या कडा मुरगळल्या जातात.
या किडीवर उपाय योजना होण्यासाठी तसेच शेंगावरील करपा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, दाण्याचे वजन वाढण्यासाठी व दाण्यातील ऑइल percentage वाढण्यासाठी डायफेनथेरॉन 47.80 SC + टेब्युकोनाझोल 12.5 ml प्रति दहा लिटर किंवा टेब्युकोनाझोल 10 टक्के + सल्फर 65 टक्के 30 gm प्रति १० लिटर यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी घ्यावी. तसेच जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी वाई श्री हरिश्चंद्र धुमाळ यांनी केले आहे.




