खंडाळा:-(सातारा)-तहसिल कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा.
संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
खंडाळा तहसिल कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा.
खंडाळा – आज १५ ऑगस्ट खंडाळा तालुक्यातील तहसिल कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
तहसिल कार्यालय खंडाळा चे निवासी नायब तहसिलदार श्री. हेमंत कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली त्यावेळी खंडाळा पोलिस निरीक्षकांच्या उपस्थिती मध्ये पोलिस दलाने सलामी दिली.
त्याचबरोबर महसूल नायब तहसिलदार श्री. स्वप्निल खोल्लम तसेच महसूल कर्मचारी वर्ग, आजी माजी सैनिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रम पार पडल्यानंतर सेवा हमी कायदा अंतर्गत नागरी सुविधा केंद्र सेतू मध्ये कार्यालय कक्षाचे उद्घाटन नायब तहसिलदार श्री. स्वप्निल खोल्लम व नायब तहसिलदार हेमंत कामत यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान सर्व महसूल अधिकारी कर्मचारी व सेतू चालक कर्मचारी उपस्थित होते.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन