कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्डे व मानवनिर्मित उघडे गटार यांमुळे होणाऱ्या अपघातांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्डे व मानवनिर्मित उघडे गटार यांमुळे होणाऱ्या अपघातांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना.

सिंधुदुर्गनगरी : मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील जनहित याचिका क्र. ७९/२०१३ वर दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्डे व मानवनिर्मित उघडे गटार यांमुळे होणाऱ्या अपघातांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात येणार असून अपघातग्रस्तांना नुकसानभरपाईही दिली जाणार आहे.