वाई:-शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने भुईमूग लागवड करावी – श्री धुमाळ
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने भुईमूग लागवड करावी – श्री धुमाळ

भुईमूग हे आपले पारंपरिक तेलबिया पीक आहे. सध्या सोयाबीनची वाढते क्षेत्र व पडलेले बाजार भाव लक्षात घेता आधुनिक पद्धतीने भुईमूग लागवड केल्यास उत्पादनात निश्चितपणे वाढ होईल व आर्थिक फायदाही नक्की होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भुईमूग या पिकाकडे वळावे व आधुनिक पद्धतीने भुईमूग लागवड करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री हरिश्चंद्र धुमाळ यांनी केले आहे. राष्ट्रीय खाद्य तेल अभियान अंतर्गत दोन दिवसीय भुईमूग पीक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम वेळी ते बोलत होते.
भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचे तेलबिया पीक असल्याने रोजच्या आहारात याचा समावेश असल्याने भुईमूग व त्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना बाजारात निश्चितपणे मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भुईमुगापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगाकडेही वळावे असेही श्री धुमाळ यांनी सांगितले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र येथील विषय विशेषज्ञ संग्राम पाटील यांनी भुईमूग लागवडीच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ कल्याण बाबर यांनी भुईमुगापासून तयार होणाऱ्या पदार्थांची तसेच प्रक्रिया उद्योगांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी श्री रविंद्र बेलदार यांनी केले, सूत्रसंचालन उप कृषी अधिकारी श्री निखिल मोरे व आभार प्रदर्शन उप कृषी अधिकारी श्री किरण बाबर यांनी केले, कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी वाई अधिनस्त सर्व कर्मचारी व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




