सातारा:-नमो युवा रन मध्ये सर्वधर्मीय युवा सातारकर सामील….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
नमो युवा रन मध्ये सर्वधर्मीय युवा सातारकर सामील….

सातारा दि: सध्या देशभर जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर नशा मुक्त भारत हे अभियान राबवले जात आहे. त्याचाच भाग म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरात भारतीय जनता पक्षातर्फे दिनांक १७ ते महात्मा गांधी जयंती दि: २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा सुशासन पंधरावडा व रविवारी दि २१ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता नमो युवा रन मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून नमो युवा रन सहभागी सातारकर सर्वधर्मीयांना मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अनेकांचा उत्साह शिंगेला पोहोचला.
सातारा नमो युवा रनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, सुनील काटकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, डॉ. शेखर घोरपडे, भाजपचे मनीष महाडवाले, भाजप शहराध्यक्ष अविनाश खर्शीकर, सौ सुनिशा शहा , गीतांजली कदम,प्रसिद्धीप्रमुख विकास गोसावी, संतोष कणसे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा नमो युवा रन यशस्वी सोहळ्याने सातारकरांनी त्याचे मनापासून स्वागत केले. विशेष बाब म्हणजे सर्वधर्मीय युवकांनी तसेच युवतींनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन नशा मुक्त भारत आणि जातीयवाद मुक्त भारत निर्माण होऊ शकतो. याची चुणूक सातारा शहरात दाखवली.
नमो युवा रन सुरू झाल्यापासून सर्वांमध्ये उत्साह संचारला होता. सातारा शहरातील पोलीस कवायत मैदान या ठिकाणी पहाटे पाच वाजल्यापासून स्पर्धकांनी येण्यास सुरुवात केली होती. सूर्योदय नंतर मोठ्या प्रमाणात स्पर्धक आले. भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी यावेळी हजेरी लावली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपुतळ्याला अभिवादन केले .शिवतीर्थावरून पवई नाका, रयत शिक्षण संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरून, जामा मशीद मार्ग, कमानी हौद ,देवी चौक, मोती चौक, गोलबाग, पंचमुखी गणपती मंदिर, शनिवार चौक, शेटे चौक व मल्हारपेठ, पोलीस मुख्यालय, नाका आणि पोलीस कवायत मैदान अशा पद्धतीने नमो युवा रनने सातारा शहराला एक वेगळा संदेश देण्यात आला. कोणत्याही प्रकारचा अडथळा न करता अत्यंत साधेपणाने पण मार्मिक संदेश देण्यात आला.या नमो युवा रनचे सर्व धर्मीय सातारकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
दरवर्षी असा उपक्रम सातारा शहर नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात राबवल्यास संपूर्ण सहकार्य केले जाईल. असे आश्वासन भाजप जावळी तालुकाध्यक्ष संदीप परामणे, खटावचे अनिल माळी, भाजपचे युवा नेते सुनील काळेकर, अमोल कांबळे, विठ्ठल देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सातारच्या सामाजिक ऐक्याचीही नमो युवा रन मुळे दर्शन घडले आहे.
नमो युवा रन सोहळ्यासाठी माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, संग्राम बर्गे, अमोल भिसे, सुरभी भोसले, विजय काटवटे, पायल जाधव, सुवर्णा पाटील, विजय नाईक, डॉ. संग्राम देशमुख, अभय जाधव, शफी इनामदार, अझर मणेर, सलीम अत्तार, इम्तियाज मुलानी, पंकज खुडे, श्रीकांत आंबेकर, सारा खुडे, धनाजी पाटील, पंकज चव्हाण, अनुप मोरे, बाळासाहेब ननावरे, राजू महाडिक, सुदर्शन पाटसकर, राम हदगे यांच्यासह अनेकांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
जातीय सलोखा निर्माण करण्यास या निमित्ताने हातभार लावला आहे. त्याबद्दल शांतता प्रिय सातारकरांनी आयोजकांना धन्यवाद दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो युवारण राजधानी सातारा २०२५ व नशा मुक्त भारत मॅरेथॉनच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचे अनावरण केले होते. जवळपास तीन हजार स्पर्धकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सर्व स्पर्धकांना रन साठी आवश्यक साहित्याचे मोफत वाटप केले. कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात न आल्यामुळे सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, शेतमजूर ,हमाल, हातावर पोट असणारे अनेक जणांनी सहभागी होऊन दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणारी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी धावू शकतो. ही सिद्ध करून दाखवले. त्यांचे आयोजकांनीही मनापासून आभार मानले. भाजप समन्वयक सुनील काटकर, चिन्मय कुलकर्णी व विकास गोसावी संदीप शिंदे यांच्या विशेष प्रयत्नामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सातारा वाहतूक पोलीस शहर पोलीस शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नमो युवा रन साठी परिश्रम घेतले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन



