ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई :- वाई पाचवड रस्त्यावर वाकेश्वर जवळ एसटीचा जोरदार अपघात.

प्रतिनिधी:- आशितोष चव्हाण :-8208717483

वाई :- वाई पाचवड रस्त्यावर वाकेश्वर जवळ एसटीचा जोरदार अपघात.

वाई आगाराच्या सातारा वाई एसटीला पाचवड वाई रस्त्यावरील वाकेश्वर परिसरात समोरुन भरघाव वेगाने येणार्या गैससिलेंडरने भरलेल्या मालट्रकने समोरुन जोराची धडक दिल्याने त्यात एसटी चालक गंभीर जखमी झाले असून काही प्रवासी देखील जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे हि धडक एवढी भिषण आहे कि मालट्रकने एसटीचा समोरील सर्व भागाचा चक्काचुर केला आहे .या अपघाताची माहिती वाई आगारात पोहचताच अधिकारी आणी कर्मचारी वर्गातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये चालक संदीप शिंदे रा. भिकवडी येथील असून वाई आगारामध्ये चालक पदावरती काम करत आहेत. अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्यावर ते असे समजले की, चालक संदीप शिंदे यांचा हात आणि पाय फ्रॅक्चर झालेला आहे. सध्या मिशन हॉस्पिटल वाई येथे त्यांचा उपचार चालू आहे. चालक संदीप शिंदे यांच्यावरती पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. घरात ते एकटेच कमवते आहेत. त्यामुळे आय वाई आगार व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक यांनी जातीने लक्ष घालून त्यांचा पूर्ण उपचार करावा. ते पूर्ण बरे होईपर्यंत सगळ्यांनी जातीने लक्ष देऊन आपले कर्तव्य बजावावे. असे पूर्ण चालक वाहक वर्गातून बोलले जात आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button