पुणे चिंचवड:-गुन्हे शाखा युनिट 1 ने उल्लेखनीय कामगिरी करीत एकाच दिवशी दोन कार चोरणा-यास अटक केली.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
गुन्हे शाखा युनिट 1 ने उल्लेखनीय कामगिरी करीत
एकाच दिवशी दोन कार चोरणा-यास अटक केली.
चिंचवड, दि. 24 (शफिक शेख):- शरद हौसिंग सोसायटी, निगडी येथून एकाच दिवशी दोन कार चोरणा-या चोरास चिंचवड पोलिसांनी मोठया शिताफीने पाठलाग करीत राजस्थान येथून अटक करून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातून चिंचवड पोलिसांची आभार मानले जात आहे.
से.नं. 27, शरद हौसिंग सोसायटी, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे राहणारे हेमंत यशवंत भोसले यांची छुदाई आय-20 कार तसेच नितीन नितीन माणिकराव पवार यांची हुदाई क्रेटा अशा दोन कार रात्रीच्या वेळी सोसायटीमध्ये पार्क केल्या असताना त्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. त्याबाबत हेमंत यशवंत भोसले यांनी दिलेल्या फिर्यादी वरून निगडी पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं. 831/2022 भादवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल आहे.
वरिष्ठांचे आदेशान्वये दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस पथक करीत असताना गुन्ह्याचे ठिकाणी तसेच इतर वेगवेळ्या ठिकाणचे सी.सी.टिव्ही फुटेज चेक करत असताना सदरच्या दोन्ही कार हया नाशिकरोडने गेल्या असल्याचे त्यांना दिसुन आहे. तपास पथकाने नाशिक हायवेवरील सिसिटिव्ही फुटेज येवला, जिल्हा नाशिकपर्यन्त चेक केले असता त्यांना सदरच्या दोन्ही कारचे नंबर प्लेट बदली करुन राजस्थानच्या दिशेने जात असल्याचे दिसुन आले. तसेच त्याच्या सोबत असणाया आय टेन हया तिस-या गाडीचा नंबर मिळाला. सदरच्या नंबरवरुन मालकाचा नाव, पत्ता मिळुवुन त्याबाबत तपास केला असता गाडी मालकाचे मोबाईल हा घटनेच्या आदल्या दिवशी सध्याकाळी ठाणे शहर हद्दीत दिसुन आले तसेच त्या कारवर वाहतुक विभागाचे चलनही त्याच वेळी ठाणे शहर हद्दीत पडलेले असल्याचे दिसुन आले. सदरच्या फ़ोनचे दुस-या दिवशी सकाळचे लोकेशन हे येवला, नाशीक येथे दिसुन आले. यावरुन तपासपथकाला सदरच्या दोन्ही कारची चोरी त्याच कारचे मालकाने त्याच्या साथीदारासमवेत येवुन केलेली असावी असा संशय निर्माण झाला.
सदरबाबतची खातरजमा करणेकामी गुन्हे शाखा युनिट 1 चे पो.हवा. बाळु कोकाटे, महादेव जावळे, फारूक मुल्ला, सोमनाथ बो-हाडे, प्रमोद हिरळकर असे पोलीसपथक सांचौर, जि. जालोर, राजस्थान येथे पाठविले होते. सदरचे पथकाने तेथे जावुन सलग 4 दिवस तेथे राहुन आरोपीबाबत गोपनीय माहिती काढली असता सदरचा आरोपी नामे रमेश प्रभुराम विष्णोई, वय 24 वर्षे, रा. सियागाव, पुर, ता. सांचौर, जि. जालोर, राज्य राजस्थान यांस स्थानिक पोलीस स्टेशनमधिल रेकार्डवरील गुन्हेगार असुन त्याचे साथीदार हे अफिम तस्करीमध्ये पाहिजे आरोपी आहेत. गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले आरोपी असल्याने तपास पथकाने गोपनीय पदधतीने पाळत ठेवुन आरोपी रमेश प्रभुराम विष्णोई यास सांचोर, जिल्हा जालोर, राजस्थान येथील मार्केट मध्ये मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस आल्याची चाहुल लागताच त्याचे ईतर साथीदार पळुन गेले. आरोपीकडे सखोल तपास करता त्याने त्याचा मित्र सुरेश वाघाराम, रा. बाडमेर, राजस्थान याच्या मदतीने सदरच्या दोन्ही कार चोरल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी चोरलेल्या हुदांई आय-20 व क्रेटा अशा दोन्ही गाड्या किंमत 20 लाख हया त्याचे मुळ गावातुन हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहीया, अपर पोलीस आयुक्त संजयकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोेरे, सहा. पो. आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस अंमलदार बाळू कोकाटे, महादेव जावळे, फारूख मुल्ला, सोमनाथ बो-हाडे, मनोजकुमार कमले, प्रमोद हिरवळकर यांच्या पथकाने केली त्यास तांत्रिक शाखेचे पा. ह.प्रशांत माळी यांनी विशेष सहकार्य केले.