आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-लाडक्या बहिणीने एस.टी. बस मध्ये साजरा केला रक्षाबंधन…..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

लाडक्या बहिणीने एस.टी. बस मध्ये साजरा केला रक्षाबंधन…..

सातारा दि: मानवी सर्वच नाती ही पवित्र असतात. या नात्यांना रक्ताचे बंधन असते. भारतीय संस्कृतीमध्ये बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या भावाच्या मनगटावर राखी बांधून बहीण आपले कर्तव्य सिद्ध करते. तसेच भाऊ सुद्धा कर्तव्य पार पाडतो. सातारा येथील बस स्थानकात सध्या एस.टी. बस चालक व बहिणीच्या रक्षाबंधनाच्या घटनेने अनेक जण सुखावले आहेत. खरोखरच प्रवाशांच्या सेवेसाठी झटणाऱ्या भावाने बहिणीच्या हातून राखी बांधून आपले कर्तव्यही पार पाडले.
याबाबत माहिती अशी की, एस.टी. महामंडळाच्या ठाणे आगारात चालक म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील भिकाजी कारंडे यांनी अनेकदा सुरक्षित रित्या एस.टी.बस चालवून प्रवाशांची काळजी घेतलेली आहे. रक्षाबंधननिमित्त साताऱ्यात लाडकी बहीण योजनेच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व मान्यवर साताऱ्यात आले . त्यांनाही अनेक बहिणींनी राखी बांधली. या कार्यासाठी सातारा जिल्ह्यातील बस स्थानकातील काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पण , कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील रोहिणी तानाजी चव्हाण या बहिणीने आपल्या भावाला राखी बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एस.टी.बसचा आधार घेतला. एस.टी. चालक व भाऊ भिकाजी कारंडे हे एस.टी.बसचे स्टेरिंग हातात घेत असतानाच बहिणीने त्यांना राखी बांधून भाऊ बहिणीचे अतूट नाते सर्व प्रवाशांना दाखवून दिले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे एस.टी.बस महामंडळाच्या मानवतावादी दृष्टिकोनाची ही चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे.
सातारा बस स्थानकात एका बाजूला उर्मट एस.टी. अधिकाऱ्याकडून ताटकळत बसलेल्या प्रवाशी व महिलांचा अवमान होत असतानाच एका साध्या चालकाने आपल्या बहिणीच्या हस्ते राखी बांधून आपलं कर्तव्य पार पाडलेले आहे. यामुळे एस.टी. महामंडळातील सर्वच वाहक व चालकांचा गौरव महिला वर्गाने केला. तर उर्मट अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान, याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी निवेदन देऊन आंदोलनाची तारीख जाहीर केली असल्याने या अधिकारावर कारवाई केव्हा होणार? याकडे लक्ष लागलेले आहे. असे काही प्रवाशांनी सांगितले. ………………………… फोटो -सातारा बस स्थानकामध्ये एसटी बस मध्येच अनोखी रक्षाबंधन..

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button