निफाड:-वाहेगाव दहेगाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी श्री भगवान भाऊ शिवाजी ती पाहिले यांची बिनविरोध निवड.
पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रोहिदास वाघ निफाड तालुका संघटक
वाहेगाव दहेगाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी श्री भगवान भाऊ शिवाजी ती पाहिले यांची बिनविरोध निवड.
निफाड तालुक्यातील वाहेगाव दहेगाव या ग्रामपंचायती वर यापूर्वी सरपंच पदावर सौ अलका रमेश भडांगे यांनी तीन वर्ष ग्रामपंचायतचा कारभार मोठया दिमाखीत व पारदर्शक पद्धतीने पाहिला. त्यांच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत खूप प्रमाणात गावच्या विकास कामांमध्ये कर्तव्यदक्ष राहुन विकास कामे पार पाडली व एक महिला सरपंच म्हणून नावारुपास आल्या. त्यांनी वाहेगाव दहेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे मोठ्या कौशल्याने हाताळले तदनंतर त्यांनी राजीनामा दिला दिनांक २०\२\२०२४ रोजी वाहेगाव दहेगाव ग्रामपंचायती मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली श्री भगवान भाऊ शिवाजी तिपायले यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच मागील महिला सरपंच सौ अलका रमेश भडांगे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी हा सत्कार स्वीकारून नवीन निवड झालेले सरपंच श्री भगवान भाऊ तिपायले यांच्या निवडीचे स्वागत केले व त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. या निवडी प्रसंगी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित महिला उपसरपंच सौ वैशाली दत्तू भडांगे महिला सदस्य सौ शीलाताई बाळासाहेब गांगुर्डे सौ कांताबाई लक्ष्मण आहेर सौ उज्वला विक्रम वाबळे सदस्य श्री चेतन भगीरथ आहेर दीपक बबन डुंबरे बापूसाहेब पवार तसेच ग्रामसेवक श्री अनिल कदम साहेब हे उपस्थित राहिले तसेच गावातील जेष्ठ नागरिक नवनाथ रामभाऊ आहेर तसेच माजी सरपंच दशरथ मोतीराम आहेर संजय भाऊ कापडी भरत नवनाथ आहेर उद्धव भाऊ चेचरे गिरीधर काकासाहेब आहेर तसेच दहेगाव चे श्री शरद रमेश भडांगे श्री विजय कचश्वर भडांगे दत्तू भाऊ पांडुरंग भडांगे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच जेष्ठ नागरिक हे उपस्थित राहिले सर्वांनी श्री भगवान भाऊ शिवाजी तिपायले यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.