सिंधुदुर्ग:-मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा तेरावा वर्धापन दिन सोहळा १ डिसेंबर पासून.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा तेरावा वर्धापन दिन सोहळा १ डिसेंबर पासून.

मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा तेरावा वर्धापन दिन सोहळा १ डिसेंबर पासून सुरू होत आहे. ३ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात सोमवार १डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थ मठातून वायंगणी गावात पालखी प्रस्थान व वायंगणी गावात पालखी परिक्रमा दुपारी बारा वाजता ठाणेश्वर मंदिर येथे महाप्रसाद सायंकाळी सहा वाजता पालखीचे स्वामी मठात आगमन सात वाजता नित्य आरती. मंगळवार 2 डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता राजोपच्यारपूजा अभिषेक व सहस्त्र बिलवार्पण. सकाळी नऊ वाजता सामुदायिक श्री सत्यदत्त महापूजा, होमहवन, दुपारी आरती व महाप्रसाद सायंकाळी चार वाजता स्थानिकांची सुस्वर भजने होणार आहेत. बुधवार ३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री सत्यदत्त महापूजा, आरती, दुपारी महाप्रसाद सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, स्थानिक भजने, रात्री दहा वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ मळगाव सावंतवाडी यांचा बाळूमामांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग श्री संत सद्गुरू देवावतारी बाळूमामा ट्रिकसीन युक्त दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




