सातारा जिल्हा परिषदेत रेट कार्डच्या बॉम्बे भ्रष्टाचाराचा स्फोट.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा जिल्हा परिषदेत रेट कार्डच्या बॉम्बे भ्रष्टाचाराचा स्फोट.
सातारा दि: मिनी मंत्रालय अशी ख्याती असलेल्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी जिल्हा परिषदेतील बांधकाम उत्तर विभागाच्या अधिकाऱ्याची मनमान कारभार
व भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत निवेदन दिले. यामध्ये रेट कार्डच्या बॉम्बेने सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात भ्रष्टाचाराचा स्फोट झाला. दिवसभर त्याचीच चर्चा रंगू लागलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, कार्यकारी अभियंता उत्तर विभाग सातारा जिल्हा परिषद मोदी यांचा मनमानी कारभार व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबित करावे . अन्यथा दि:२६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार असा इशारा देण्याचे निवेदन दिले.
स्वतः सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी भ्रष्टाचार बंद करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने निविदा व काम वाटप केले जाईल. असे स्पष्ट केल्याने सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
सातारा जिल्हा
परिषदेमध्ये येणारे सुशिक्षित बेरोजगार अभियंता व काही कंत्राटदार यांची वारंवार तक्रार येत आहे. तरी देखील कोणतीही कारवाई केली जात नव्हती .
कार्यकारी अभियंता (उत्तर
विभाग) श्री मोदी सातारा जि. प. यांचा चालू असलेला मनमानी कारभार व शासकीय नियम पायमल्ली तुडवून खुर्चीचा गैरवापर केला होता . असे आरोप करण्यात आला होता.
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील १३ कोटीचे काम मॅनेज करण्यासाठी मोठ्या
प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मोदींनी आपल्या मर्जीतील सांगलीतील एका कंपनीला हे काम दिले. अशी चर्चा जिल्हा सातारा परिषदेमध्ये आहे.
जसे हॉटेलचे मेनू कार्ड व रेट कार्ड असतात,नेमकं तेच सातारा जिल्हा परिषदेत रेड कार्ड आहे.
तांत्रिक मंजुरी एक टक्का , निविदा देणे कामाची वर्क ऑर्डर देणे एक टक्का तसेच काम झाल्यानंतर त्या कामाचे देख अदा करणे दोन टक्के एवढं सर्व झाले तरी अनामत रक्कम काढून घेण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात बेरोजगार अभियंता यांना परवाना देण्यासाठी टाळाटाळ करून प्रस्थापित ठेकेदारांनाच कामे दिली जातात
बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी पाठपुरावा केल्यानंतर त्याच्याकडून पैसे घेऊन बांधकाम ठेका घेण्याचा परवाना दिला जातो. अशा अनेक बाबी निवेदनात उघडकीस आल्या.
हे निवेदन वाचून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांच्या सुद्धा चांगलाच पारा चढला. त्यांनी तातडीने सर्व गोष्टी ऑनलाईन करण्याची घोषणा केल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. या सर्व गोष्टींची पडताळणी व चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा श्री रमेश उबाळे हे प्रजासत्ताक दिनी दिनांक 26 जानेवारी रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर आत्मदहन करतील. असं श्री रमेश उबाळे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना ठणकावून सांगितल्यामुळे या गंभीर प्रकरणाकडे आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान या बाबी प्रसारमाध्यमाच्या समोर उघडकीस आल्यामुळे सातारा जिल्हा परिषद बीट म्हणजे भ्रष्टाचाराचे कुराण झाले का असं माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शंका घेतली आहे.