महाबळेश्वर:- महाबळेश्वर येथे भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष:-9403546485

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष
तहसिलदार कार्यालय महाबळेश्वर येथे तहसिलदार तेजस्विनी खोचरे पाटील मॅडम तसेच गिरिस्थान नगरपालिका व सुभाष चंद्र बोस चौक येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील मॅडम व अर्बन बँक येथे चेअरमन दतात्रय वाडकर यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात ध्वजारोहन करण्यात आले.
सदरच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यकमात शालेय विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीते सादर केली या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष डी. एम्. बावळेकर , युसूफ भाई शेख, मा उपनगराध्यक्ष अफजल भाई सुतार, नगरसेवक प्रकाश पाटील, संदिप साळुंखे, तसेच भाजपाचे राजेंद्र पवार, उषाताई ओंबळे,अर्बन बँक परिवार चेअरमन दत्तात्रय वाडकर, व्हा चेअरमन जावेद भाई वलगे , संचालक राजेश कुंभारदरे, बाळासाहेब कोंडाळकर, समीर सुतार, मुख्य व्यवस्थापक फकीरभाई वलगे व कर्मचारी तसेच नगरपालिका मुख्य लिपिक आबाजी ढोबळे व नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी वर्ग , शालेय विध्यार्थी शिक्षकवर्ग व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती नगरपालिका व इतर सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती स्वातंत्र दिना चा हा राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहाने व जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.