वाई:-मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये किसन वीर महाविद्यालय नृत्यकलेत प्रथम सहभागी सर्व कलाकार विद्यार्थ्यांचे मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते जाहीर सत्कार.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
वाई दि.25
मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये
किसन वीर महाविद्यालय नृत्यकलेत प्रथम
सहभागी सर्व कलाकार विद्यार्थ्यांचे मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते जाहीर सत्कार.
दहिवडी महाविद्यालय दहिवडी येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या ४३ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये किसन वीर महाविद्यालयाने लोकनृत्य या कला प्रकारांमध्ये त्रिपुरा या राज्यातील प्रसिद्ध असलेला होजागिरी नृत्य सादर करून शिवाजी विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून कै. बाबासाहेब माने लोककला चॅम्पियन चषकावर आपले नाव कोरले. लोकनृत्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींचा व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. धनंजय निंबाळकर यांचा सत्कार जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या वेळी संस्थेचे सचिव, डॉ.जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे, पुण्यातील प्रसिद्ध व्याख्याते भूषण केळकर व मधुरा केळकर यांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. जयवंत चौधरी म्हणाले की, “किसन वीर महाविद्यालयाने गेली अनेक वर्ष शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये कला व सांस्कृतिक विभागात आपले नाव उज्वल केले आहे. आपल्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनीचे शिवाजी विद्यापीठाच्या सांस्कृतिक संघात निवड होऊन; राष्ट्रीय पातळीवर झेंडा रोवला आहे. कु. चारुकेशी चव्हाण, कु. प्रियांका वालकोळी, कु. प्राची भिलारे, श्री नितीन शिंदे या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजवले आहे. आपल्या महाविद्यालयाने गेल्या सात वर्षात ही नृत्य कलेतील चॅम्पियनशिप ट्रॉफी तिसऱ्यांदा आणलेली आहे. त्यामुळे हा विभाग सक्षमपणे सांभाळणारे डॉ. धनंजय निंबाळकर यांचे मनापासून कौतुक आहे”.
या प्रसंगी डॉ. धनंजय निंबाळकर प्रास्ताविकेत म्हणाले की, “गेली ३० दिवस न थकता या नृत्याचा सराव आमच्या विद्यार्थिनींनी केला. शेवटच्या काही दिवसात संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी वेळ काढून; अचूक असे मार्गदर्शन आम्हाला केले. दादांची उपस्थिती ही आम्हाला एक नवी ऊर्जा देऊन गेली. प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे यांचेही वेळोवेळी सहकार्य मिळाले. त्यामुळेच आम्ही हे यश संपादन करू शकलो”. यानंतर या नृत्यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींचा मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या प्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, सेवक वर्ग तसेच कला व सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्य, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार गणेश चव्हाण यांनी मानले.