आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-चांद्रयान लाइव्ह प्रक्षेपण गिरवी, आरडगांव, फरांदवाडी केंद्रातील शाळांमध्ये पाहिल्याने , विद्यार्थी भारावले.!

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष:-9762274165

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

चांद्रयान लाइव्ह प्रक्षेपण गिरवी, आरडगांव, फरांदवाडी केंद्रातील शाळांमध्ये पाहिल्याने , विद्यार्थी भारावले.!

फलटण तालुक्यातील गिरवी व आरडगांव फरांदवाडी केंद्रातील सर्व शाळांनी शाळेत चांद्रयान मोहीम लाइव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यामुळे विद्यार्थी भारावले आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी मदत झाली.अशी माहिती फलटण तालुक्यातील गिरवी व आरडगांव फरांदवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिलकुमार कदम यांनी दिली.
अनिलकुमार कदम म्हणाले की, फलटण तालुक्यातील गिरवी व आरडगांव फरांदवाडी केंद्रातील शाळा मधून चांद्रयान मोहीम लाइव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन शाळां मुख्याध्यापक व शिक्षकांनी नियोजन करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व विज्ञानाच्या क्षेत्रात होणारे क्रांतिकारक बदल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी विशेष कौतुकास्पद कामगिरी केली.शाळामधील विद्यार्थ्यांना चांद्रयान मोहीम लाइव्ह प्रक्षेपण पाहयला मिळाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आनंद झाला व वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ होण्यासाठी मदत झाली.अनेक विद्यार्थ्यांनी कुतूहलाने अनेक प्रश्न शिक्षकांना विचारले त्या प्रश्नांची उत्तरे शिक्षकांनी तंत्रज्ञान संगणक माध्यमातून दिली.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.नवी वैज्ञानिक माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थी समाधानी झाल्याचे चित्र दिसत आहे.अशा विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रम, प्रकल्प, आधुनिक तंत्रज्ञान संगणक माध्यमातून शिक्षणासोबतच नवनवे प्रयोग करून गिरवी व आरडगांव फरांदवाडी केंद्रातील शिक्षक शैक्षणिक विकासासाठी कामकाज करत असतात.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button