वैजापूर:-112 वर खोटी माहिती देऊन पोलीस प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वैजापूर:-112 वर खोटी माहिती देऊन पोलीस प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल.

फिर्यादी दि 19/10/2025 मी शुभम आत्माराम रावते वय 26 वर्षे व्यवसाय -पो. अं 117 नेमणुक पोलीस ठाणे वैजापुर, ता. वैजापुर नेमणुक पोलीस ठाणे वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर ग्रा.भो.के. 7350127113. सरकार तर्फे फिर्यादी होवुन फिर्याद देतो की, मी वरील ठिकाणी मागील तीन महीण्यापासुन नेमणुकीस जनरल ड्युटी करतो. दिनांक 18/10/2025 रोजी 08.00 वाजेपासुन ते दि.19/10/2025 वाजे पावेतो माझी डायल 112 ड्युटी नेमलेली होती. आज दि. 19/10/2025 रोजी ड्युटीवर असतांना 06.59 वा. एम.डी.टी. नं.2 वर मो.नं. 9545333110 मदन शिवाजी ठोंबरे रा. भायगाव ता वैजापूर यांचा कॉल आला व त्यांनी कॉलद्वारे कळविले की, जरुळ फाटा येथे अनोळखी महिलेची डेथ बॉडी पडलेली आहे, असा कॉल आल्याने भी व सोबत पोकों /150 उशीर असे जरूळ फाटा येथे घटनास्थळी 07.00 वाजता रवाना झालो. आम्ही 07.15 वाजताचे सुमारास घटनास्थळी पोहोचलो व सदर कॉलर यांना फोन केला असता सदर ठिकाणी कोणतीही डेथ बॉडी मिळुन आलेली नाही, आम्ही तेथील लोकांना विचारपुस करता कोणतीही डेथ बॉडी नसल्याचे समजले व सदर कॉलस्ने खोटी माहीती देवुन अॅम्ब्युलंस यांना सुध्दा घटनास्थळी बोलविले होते तरी दि. 19/10/2025 रोजी मी ड्युटीवर असतांना 06.59 वा. एम.डी.टी. नं. बी. एम. 2 वर कॉलर नामे मदन शिवाजी, ठोंबरे रा. भायगाव ता. वैजापूर मो. नं. 9545333110 यांनी विनाकारण पोलीसांना खोटी खबर दिल्याचे निष्पन्न झाले तरी सदर कॉलर यांनी कोणतीही अत्यावश्यक परिस्थिती उद्भवली नसतांनाही पोलीसांना व्यस्त ठेवुन डायल 112 वा प्रणालीचा इतर गरजु लोकांना लाभ होवु नये, म्हणुन खोटी माहिती कळविली व डायल 112 या प्रणालीचा दुरुपयोग केला म्हणुन इसम नामे मदन शिवाजी ठोंबरे रा. भायगाव ता वैजापूर याने डायल 112 या प्रणालीवर खोटी माहिती दिली म्हणुन माझी त्याचे विरुद्ध कलम 212 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. समक्ष ही फिर्याद दिली आहे.




