मायणी:-शिवप्रताप मल्टीस्टेट मायणी शाखेचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शिवप्रताप मल्टीस्टेट मायणी शाखेचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

मायणी प्रतिनिधी—-शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी विटा शाखा मायणी या शाखेचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी शाखाधिकारी सतीश कोकाटे यांनी शाखेच्या प्रगतीचा आढावा घेऊन शाखेने आठ वर्षात 24 कोटी दहा लाखाचा व्यवसाय केला असल्याचे सांगितले संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले की संस्थेचे चेअरमन स्वर्गीय प्रताप शेठ साळुंखे दादा यांनी उत्तम सेवा व सुरक्षा हे ब्रीदवाक्य घोषित केले होते या वाक्यास अनुसरून संस्थेची वाटचाल सुरू आहे लवकरच ही संस्था 1000 कोटी व्यवसाय पूर्ण करणार आहे तसेच सभासदा प्रति आपली बांधिलकी सिद्ध करत सहकार क्षेत्रात नवे पर्व निर्माण केले आहे संस्थेने यंदा सभासदांना दुहेरी लाभांश देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे दुहेरी लाभांश देणारी ही महाराष्ट्रातील पहिली संस्था ठरली आहे या उपक्रमामुळे सहकार क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले संस्थेचे संचालक सतीश साळुंखे यांनी मायणीशाखेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले या कार्यक्रमास व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ डॉक्टर सयाजी पवार, घारगे गुरुजी, बाळासाहेब महामुनी, धोंडीराम हटकर, संस्थेची सभासद, ठेवीदार, व्यापारी, दुकानदार , हितचिंतक, मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सतीश कोकाटे यांनी आभार मानले.




