मायणी:-यशोदीप सोसायटी सभासदांना १० टक्के लाभांश देणार – चेअरमन मोहनराव दगडे.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
यशोदीप सोसायटी सभासदांना १० टक्के लाभांश देणार – चेअरमन मोहनराव दगडे.

मायणी प्रतिनिधी——- (फोटो – वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन मोहनराव दगडे,सोबत मान्यवर) मायणी येथील यशोदीप सोसायटीस यंदा १२ लाख ४९ हजार ५३१ रुपये नफा झाला असून यंदा सभासदांना १० टक्के लाभांश देणार असल्याचे सांगितले.त्यास सर्व सभासदांनी संमती दिली. ते म्हणाले,माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे कामकाज उत्कृष्ट प्रकारे सुरु आहे. आमच्या संस्थेचे मार्गदर्शक संजय गुदगे यांचेही सोसायटीस सहकार्य मिळत आहे. दरवर्षी नफ्यामध्ये वाढ होत आहे,ही समाधानाची बाब आहे. लवकरच आम्ही पूरग्रस्तांसाठी भरीव मदत देणार आहोत असे सांगितले. सभेच्या सुरुवातीस सचिव गंगाराम सुगदरे अहवाल वाचन केले. व सर्व सभासदांचे आभार मानले. वार्षिक सर्वसाधारण सभेस माजी उपसरपंच आनंदराव शेवाळे, व्हॉईस चेअरमन केशवराव शिंदे,शहाजी माने,सुनिल जाधव,शरद जाधव,दत्तात्रय काबुगडे, राजकुमार काबुगडे,उत्तम घोलप,दीपक जाधव,पुष्पा घार्गे,सुनिल तारळेकर,धनाजी देशमुख उपस्थित होते.




