पारनेर दुध संघावर – विखे समर्थक जनसेवा पॅनलचा दणदणीत विजय!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पारनेर दुध संघावर – विखे समर्थक जनसेवा पॅनलचा दणदणीत विजय!
(पारनेर दुध संघाचे किंगमेकर राहुल शिंदे पाटिल)
दि,११ पारनेर (प्रतिनिधी)
पारनेर तालुका दुध संघाची निवडनुक जाहीर झाल्यापासुन पारनेरच्या राजकारणात काही बदल होण्याची खलबते चालु होती.परंतु पारनेर तालुका दुध संघाचे मतदान मोजके असल्याने पारनेर तालुक्याचा विकास समोर ठेवुन सर्व मतदारांनी खर्या लोकशाहीला मतदान केल्याचे चित्र आज दुध संघाच्या निवडनुकीतुन आज पहावयास मिळाले.
पारनेर तालुका दुध संघात एकुन मतदान ८१ होते घडलेले मतदान हे ६६ झाले, दुध संघाच्या निवडनुकित विखे समर्थकांचा जनसेवा पॅनलसाठी राहुल शिंदे पाटील,तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी विशेष परीश्रम घेऊन पारनेर तालुका दुध संघावर परत आपली पकड कायम ठेवली.
पारनेर तालुका दुध संघावर नव निर्वाचित संचालक म्हणुन ,सविता औटी,उत्तम भालेकर,कल्याण काळे,मारुती मुंगशे,दत्ता पवार,संदीप ठुबे,दादाभाउ वारे,किसन गवळी,भिमा शिंदे,युवराज पठारे,राजेंद्र पाचारणे असे संचालक म्हणुन भरघोस मतांनी निवडुन आले त्यांचे पारनेर तालुक्याच्या वतीने अभिंनदन करण्यात आले,
पारनेर तालुका दुध संघाचे किंगमेकर राहुल दादा शिंदे (पाटील) यांनी विरोधकांना चांगला धक्का दिला असुन आगामी जिल्हा परीषद निवडनुकिसाठी नव संजीवनीच समर्थकांना दिली आहे.