ताज्या घडामोडी
माळेवाडी:-गरिबीवर मात करत यशाचा टप्पा गाठणारी कु . पल्लवी अशोक साळवे – अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीत भरारी ……
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
गरिबीवर मात करत यशाचा टप्पा गाठणारी कु . पल्लवी अशोक साळवे – अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीत भरारी ……
माळेवाडी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य असोसिएशनच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानत्वाखाली शिवशक्ती महिला संघ यांच्या वतीने आयोजित १८ वर्षाखालील मुले व मुलींच्या प्रथमच होणाऱ्या राज्य आजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली आहे .ही स्वर्धा दिनांक १४ ते १७ जून २०२५ दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल . माळुगे . बालेवाडी पुणे येथे पार पडत आहे.
या स्पधैत आझाद क्रीडा मंडळाच्या . कु पल्लवी अशोक साळवे हिने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने स्थान मिळवले आहे . विशेष म्हणजे पल्लवी ही अतिशय गरीब कुटुंबातील असून देखील तिच्या जिद्दीपुढे सर्व अडथळे फिके ठरले आहेत.