वाई:-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाईतील अनेक सामाजिक संस्था कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशन,यांचे प्रयत्नातून भव्य योग साधना शिबिर महागणपती घाटावर संपन्न.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई:-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाईतील अनेक सामाजिक संस्था कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशन,यांचे प्रयत्नातून भव्य योग साधना शिबिर महागणपती घाटावर संपन्न.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाईतील अनेक सामाजिक संस्था यात कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशन, पतंजली योग समिती आर्ट ऑफ लिव्हिंग,सेवा फाऊंडेशन, भारत विकास परिषद, राष्ट्रीय छात्र सेना, वाई तालुका क्रिकेट असोसिएशन व सर्वोदय ट्रस्ट यांचे प्रयत्नातून भव्य योग साधना शिबिर महागणपती घाटावर आयोजित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रोटोकॉल नुसार एक तासाची योग साधना आर्ट ऑफ लिव्हिंग व पतंजली योग समितीच्या साधकांनी क्रिया घेऊन त्या प्रमाणे जवळपास एक हजार साधकांनी ती केली.
पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय परंपरेत योगास अनन्यसाधारण महत्त्व होते मात्र हळूहळू आपण यापासून दूर गेलो.काहीं योग गुरूंच्या अथक साधनेमुळे याच पुनरुज्जीवन झाले,सकल मानवजातीला निरोगी व आजारमुक्त व्हायचे असेल,जगात शांती हवी असेल तर योगा शिवाय पर्याय नाही याचं विशुद्ध हेतून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला हा अनमोल ठेवा जगन्मान्य व्हावा यासाठी अथक प्रयत्न करून त्यास आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देऊन २१ जून हा दिवस जाणीवपूर्वक निर्धारत करून आज पूर्ण जगभरातील सर्व देशात आंतरराष्ट्रीय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे, निश्चितच हे भविष्यात जगातील सकल ममवजातीस हितावह असेल असे प्रास्ताविकात काशिनाथ शेलार यांनी सांगितले.
मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन होऊन योग साधनेस सुरुवात झाली.
भविष्यात याही पेक्षा सर्वमान्य, सहभाग घेऊन योग साधनेचा सर्वानी फायदा करून घेऊन याच अनुकरण करू,आरोग्याची काळजी बरोबरच सामाजिक, सार्वजनिक व नदीची स्वच्छता करण्याचा आग्रह सेवाकार्य फाऊंडेशन चे अध्यक्ष प्राध्यापक श्री नितिन कदम सर यांनी इच्छा व्यक्त केली.सौ तनुजा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले व श्री भारत खामकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री नितिन कदम, श्री धनंजय मलटने,डॉ सचिन जाधव,डॉ लक्ष्मण कदम,प्राध्यापिका सौ रुपाली कदम,अतुल वाईकर,सौ ज्योती गांधी,श्री गिरीश जाधव,अरविंद बोपर्डीकर,भारत खामकर, काशिनाथ शेलार यांनी प्रयत्न केले.